मुंबई : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी सरसकट २७ टक्के आरक्षण लागू केल्याने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडल्याने सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारची भूमिका मांडण्याठी सरकारी वकिलांनी वेळ मागितल्याने पुढील सुनावणी मंगळवारी २५ नोव्हेंबरला होणार आहे. तसेच सुनावणी कालावधी दरम्यान कोणत्याही नवीन निवडणुकीची घोषणा करु नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्यास उशीर होण्यास शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरती टांगती तलवार आली आहे. (No announcement of new elections)
राज्यातील १७ जिल्हा परिषदा, ८३ पंचायत समित्या, महानगरपालिका आणि ५७ नगरपालिका नगर पंचायती अशा १५९ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. आज या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली आहे. १७ नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या यांच्या खंडपीठाने ५० टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण होता कामा नये असा इशारा दिला होता. अन्यथा निवडणुका स्थगित केल्या जातील असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. (No announcement of new elections)
राज्य सरकारने बांठिया आयोगाच्या आधारे काही स्थानिक संस्थांमध्ये ओबीसींसाठी सरसकट २७ टक्के आरक्षण लागू केले. ज्यामुळे काही जिल्हा परिषदा, नगरपालिकांमध्ये एकूण आरक्षण ७० टक्क्यापर्यंत गेले असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले की, मे २०२५ च्या आदेशानुसार निवडणुका बांठिया आयोगापूर्वीच्या स्थितीत (म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय किंवा ५०% मर्यादेत) घ्याव्या लागतील. बांठिया अहवालाची वैधता अजून न्याय प्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आल्याबद्दल राज्य सरकारवर गंभीर ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोग आणि सरकारच्या अधिकाऱ्यांमुळे हा गोंधळ झाल्याचं सांगितलं.कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मर्यादा ओलांडू नये असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच सुनावणी कालावधी दरम्यान कोणत्याही नविन निवडणुकीची घोषणा करू नये, असे आदेश दिले आहेत. (No announcement of new elections)
आजच्या सुनावणीत केंद्र सरकारची भूमिका मांडण्यासाठी तुषार मेहता यांनी वेळ मागितला, त्यामुळे पुढील सुनावणी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.