कोल्हापूर : प्रतिनिधी : शहरातील रस्ते दर्जेदार आणि सुस्थितीत आणणायासाठी आमदार राजेश क्षीरसागर आज मंगळवारी सकाळी रस्त्यांवर उतरले. शहरातील नागाळा पार्क येथे सुरु असणाऱ्या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी आमदार क्षीरसागर यांनी अचानक भेट देवून कामाची पाहणी केली. यावेळी रस्त्यांचा दर्जा, गुणवत्ता योग्य ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबधित ठेकेदारास दिल्या. (MLA Kshirsagar inspects roads)
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले आणि सुस्थितीत असावे तसेच नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये, यासाठी वारंवार मनापा प्रशासना सोबत बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. दर्जेदार रस्ते करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून, त्यावर महानगरपालिकेचा अंकुश असणे आवश्यकच आहे. यामध्ये कोणतीही कसर न राहता कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ते म्हणाले, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता निधीची अत्यंत कमतरता असल्याचे जाणवले. त्यामुळे राज्य शासनाचा विशेष निधी, जिल्हा नियोजन समिती निधी आणि आमदार फंडातून आवश्यक निधी देण्यात येत आहे. निधी देत असताना विकास कामांचा दर्जा योग्य असावा. नागरिकांकडून कोणतीही तक्रार येता कामा नये. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत ठेकेदार आणि संबधित अधिकारी यांच्यावरही जबाबदारी निश्चिती करण्यात आली आहे. रस्त्यांचा दर्जा योग्यच असावा, ही आग्रही भूमिका आहे. येत्या काळात शहर खड्डेमुक्त करून नागरिकांना दर्जेदार, टिकावू आणि गुणवत्तापूर्ण रस्ते देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. (MLA Kshirsagar inspects roads)
Kolhapur
Sandesh Kurale : राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या संदेश कुरळेने उपविजेतेपद पटकावले
कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई येथे झालेल्या एआयटीए राष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या संदेश दत्तात्रय कुरळे याने उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत संदेश कुरळेने विश्वजीत सणसचा ६-२ ६-४ पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत कनिष्क जेटलीचा ६-२ ६-१ असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. तीन सेटस् मध्ये झालेल्या उपात्य सामन्यात त्याने दीप मुनीमवर ४-६ ७-६(१) ६-२ असा विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात संदेश कुरळे आणि निरोव शेट्टी भिडले. पहिला सेट निरोवने ६-४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये संदेश चांगली लढत दिली. त्याने टायब्रेकरमध्ये ७-६ असा सेट जिंकत सामना १-१ असा बरोबरीत आणला. शेवटच्या सेटमध्ये निरोवने ६-० अशी एकतर्फीत मात करत विजेतेपद पटकावले. संदेशला उप विजतेपदावर समाधान मानावे लागले. (Sandesh Kurale)
संदेश दत्तात्रय कुरळे कोल्हापूरचा असून अर्शद देसाई टेनिस अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहे. त्याला प्रशिक्षक मनाल देसाई व अर्शद देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे. (Sandesh Kurale)
Pune Kolhapur Highway toll canceled : पुणे-कोल्हापूर महामार्गावर टोल रद्दची मागणी करणार : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रलंबित आहे, जी कामे सुरु आहेत ती कामे वेळेत आणि पूर्ण दर्जेदार करावीत. जर रस्त्यांची कामे येत्या ३१ जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण व दर्जेदार झाली नाहीत तर पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोलनाके रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सांगितले. (Pune Kolhapur Highway toll canceled)
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन.एस, माजी आमदार संजय घाटगे, राधानगरी प्रांतधिकारी प्रसाद चौगुले,नॅशनल हायवे ऑफ अथॉरिटीचे प्रकल्प संचालक संजय कदम, भैय्या माने प्रामुख्याने उपस्थित होते. (Pune Kolhapur Highway toll canceled)
ते पुढे म्हणाले, यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असल्याने सातारा कागल महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाली आहे तसेच सेवा रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत. यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, जेणेकरुन प्रवाशांचा प्रवास सुखकारक होईल. जर ३१ जानेवारीपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण आणि दर्जदार झाली नाहीत पुणे कोल्हापूर महामार्गावर रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली जाईल, असा इशाराही मुश्रीफ यांनी यावेळी दिला. (Pune Kolhapur Highway toll canceled)
गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव हे गाव १०० टक्के सोलरयुक्त करण्यात यावे. यासाठी लागणारे उर्वरित तीन कोटी रुपये सीएसआर मधून जमा करण्यात यावेत. तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे जे गाळेधारक भाडेकरु आहेत त्यांनी भाड्यापोटी मूळ रक्कम अदा करावी. मनपाने त्यांच्याकडून व्याज आकारणी करु नये, अशी सुचनाही त्यांनी केली.
मुश्रीफ यांनी मौजे बेलेवाडी मासा येथील महार वतन जमीन संपादन, गडहिंग्लज वडरगे रोड येथे नव्याने विकसित होणारे क्रीडा संकुलाच्या हद्दीतील वृक्षतोड, आंबे – ओहोळ मध्यम प्रकल्प पुनर्वसनबाबत प्रलंबित विषय, पदवीधर मतदार नोंदणीबाबत तसेच कोल्हापूर महानगरपालिकेतील भाडेवाढ संदर्भात किरकोळ किराणा दुकानदार/ व्यापाऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने दीर्घ आढावा घेतला.
या आढावा बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, निवडणूक उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, गडहिंग्लज तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी देवानंद ढेकळे, शिवराज नाईकवाडे, वनविभागाचे धैर्यशील पाटील, विलास काळे, सचिन सावंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Jyoti Jadhav : शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.ज्योती जाधव
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख प्रा.डॉ.ज्योती जाधव यांची विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी यांनी प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.जाधव यांची नियुक्ती केली. दरम्यान, प्रभारी प्र-कुलगुरू पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस आज (गुरूवारी) झालेल्या व्यवस्थापन परिषदेत केली. व्यवस्थापन परिषदेनेही त्यास संमती दिली. प्रभारी कुलगुरू प्रा.गोसावी यांनी आज सायंकाळी डॉ.जाधव यांना प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती केल्याविषयी पत्र दिले. तसेच, विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत कुलपती कार्यालयाला कळविण्यात आले. प्रा.डॉ.ज्योती जाधव यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. (Jyoti Jadhav)
डॉ.जाधव हया जागतिक आघाडीच्या शास्त्रज्ञांमध्ये समाविष्ट असलेल्या ज्येष्ठ संशोधक आहेत. त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. शिवाजी विद्यापीठात नियमित प्र- कुलगुरू नियुक्त होईपर्यंत त्यांचा प्रभारी प्र-कुलगुरूपदाचा कार्यकाल राहणार आहे. दरम्यान, आज सायंकाळी प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ.ज्योती जाधव यांचे अभिनंदन व स्वागत केले. (Jyoti Jadhav)
Shivshastra Shaurya Gatha : शिवशस्त्र शौर्यगाथा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करणार – मंत्री आशिष शेलार
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि तत्कालीन कालखंडात मराठा योध्यांकडून वापरली गेलेली शस्त्रे यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र शासनाने शिवशस्त्र शौर्यगाथा या शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन भोसले घरण्याशी संबंधित सातारा, नागपूर व कोल्हापूर या शहरांमध्ये केले आहे. हे प्रदर्शन केवळ राज्य शासनाचा उपक्रम न राहता तो लोकोत्सव म्हणून साजरा करण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले . (Shivshastra Shaurya Gatha)
राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथे आज ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या उपक्रमांतर्गत लंडन येथून आणलेल्या वाघनखे व मराठाकालीन शस्त्र प्रदर्शनाचे अशिष शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संयुक्तरित्या उद्घाटन केले.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयेन एस, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे व उपसंचालक हेमंत दळवी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या सहकार्याने राज्य शासनाने कोल्हापुरात वाघ नखे आणली आहेत. महाराजांचा दैदिप्यमान इतिहास युवा पिढी पुढे यावा. यातून युवा पिढीने प्रेरणा घ्यावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन युवा पिढीने कार्यरत रहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तर खासदार शाहू छत्रपती म्हणाले, या शस्त्र प्रदर्शनामधून मराठा शैली आणि इतर भारतीय शैलीची अप्रतिम सांगड दिसते आहे. सामान्य जनतेसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे. या प्रदर्शनात केवळ शस्त्रे नाहीत तर तो एक सजीव वारसा आहे. (Shivshastra Shaurya Gatha)
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आणि कोल्हापूर शहरात आठ महिने चालणाऱ्या या प्रदर्शनात नागरिकांना दांडपट्टा, ढाली, तलवारी, बर्चे, भाले, वाघनखे यासारखी तब्बल २३५ विविध शिवकालीन शस्त्रे पाहता येतील. यावेळी आझाद नाईकवाडी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत वीररस युक्त पोवाडा सादर केला तर भुदरगड तालुक्यातील वेंगरुळ येथील सव्यासाची गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्ध कलेची थरारक प्रात्यक्षिके लखन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केली. (Shivshastra Shaurya Gatha)
पुणे : प्रतिनिधी : इस्त्रोच्या जडणघडणीत योगदान देणारे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूष डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे वयाच्या १०० वर्षी निधन झाले. जन्मभूमी कोल्हापूर असलेल्या चिटणीसांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र पदवी संपादन करत रेडिओ संपर्कशात्र विषयात पदविकास अभ्यासक्रम पूर्ण केला होता. नुकतीच त्यांनी २५ जुलै २०२५ मध्ये वयाची शंभरी पूर्ण केली होती. (Chitnis)
अवकाश संशोधनाचा पाया घालणारे डॉ. विक्रम साराभाई यांच्या सुचनेनंतर अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् तंत्रज्ञान संस्थेतून ते भारतात अवकाश संशोधन आणि क्ष किरण संशोधनासाठी परतले. १९६० ते १९७० माध्ये त्यांनी क्ष किरण आणि अवकाश संशोधन विषयावर संशोधन केले. त्यांनी विक्रम साराभाईसह भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात त्यांनी काम केले. अवकाश उपयोजन केंद्राचे संचालक म्हणुन त्यांनी जबाबदारी निभावली. उपग्रह प्रक्षेपणासाठी त्यांनी थुम्बा हे स्थळ शोधले होते. (Chitnis)
डॉ. चिटणीस यांचा भारताचा अवकाश क्षेत्रातील इन्सॅट मालिकेतील उपग्रहाच्या आखणीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. विज्ञान क्षेत्रातील डॉ. चिटणीस यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले होते. (Chitnis)
Football players scrubbing a friend : माजी फुटबॉलपटूने मित्राला चाकूने भोकसले
कोल्हापूर : प्रतिनिधी : दीपावली दिवशी मद्यपान करत असताना झालेल्या भांडण्यात माजी फुटबॉल खेळाडूने मित्राला चाकूने भोकसले. मित्राने डोक्यात बिअरची बाटली मारली म्हणून चाकूने वार केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. आकाश भोसले (वय ३३, रा. वेताळमाळ तालीम, शिवाजी पेठ) असे माजी फुटबॉल खेळाडूचे नाव असून तर अजिंक्य अशोक साळोखे (वय ३२, रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (Football players scrubbing a friend)
अक्षय साळोखे, अजिंक्य साळोखे, आकाश भोसले हे तिघे मित्र असून तिघे सरनाईक कॉलनी येथील कोको हॉटेलच्या मागे रिकाम्या जागेत दारु पित बसले होते. रात्री सव्वातीन वाजण्याच्या सुमारास तिघांमध्ये वाद झाला. अजिंक्य साळोखे याने ‘तू माझ्या तोंडावर बिअरची बाटली का फेकलीस’ असे म्हणाला. आकाश साळोखे याने ‘मी बाटली फेकली नाही’ असे सांगितले. त्यानंतर आकाश मोबाईलवर रिल्स पहात असताना अजिंक्य साळोखेने बिअरची बाटली आकाशच्या डोक्यात मारली. त्यानंतर आकाशाने अजिंक्यला चाकूने भोकसले. चाकूचा वार अजिंक्यच्या बरकडीजवळ घुसला. त्यानंतर अजिंक्य साळोखेला ताबडतोब सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी आकाश भोसलेला अटक केली आहे. (Football players scrubbing a friend)
Six dancers attempt suicide : कोल्हापुरात सहा नृत्यांगणांचा आत्महत्येचा प्रयत्न
कोल्हापूर : प्रतिनिधी : महिला सुधारगृहातील सहा महिला नृत्यांगणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलांनी एकत्रित हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. त्यांच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. (Six dancers attempt suicide)
करवीर तालुक्यातील कळंबा येथील स्वप्नहिल फॉर्म हाऊसमध्ये अनैतिक मानवी व्यवहार प्रतिबंधक कक्ष पथकांच्या पोलिसांनी छापा टाकून सहा नृत्यांगणासह सात जणांना अटक केली होती. न्यायालयाने सातही नृत्यागणांना महिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. गेले दोन महिन्यापासून त्या सुधारगृहात आहेत. त्यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे पण त्यांचा जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात येत होत्या. त्यामुळे सहा महिला नैराश्यात गेल्या होता. शुक्रवारी सकाळी त्यांनी हाताचा नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. (Six dancers attempt suicide)
दोन महिन्यापूर्वी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात या महिला बारबाला असल्याची चर्चा होती. पण त्यांना वेश्यागमनासाठी आणले होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. सहा संशयितांनी त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले होते. पोलिसांनी फॉम हाऊसवरुन रोख ८९ हजार ५५ रुपये, पाच मोबाईल आणि साहित्य जप्त केले होते. (Six dancers attempt suicide)
Increase in milk purchase price from Gokul : गोकुळकडून म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपये वाढ
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) संघाच्या वतीने म्हैस आणि गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपये वाढ करुन दूध उत्पादकांना दिवाळी भेट दिली.
जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील गाय व म्हैशीच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्यात आली. यामध्ये म्हैस दूध ५१ रुपये ५० पैसेवरुन ५२ रुपये ५० पैसे करण्यात आला आहे. गाय दूध ३३ वरून ३४ रुपये करण्यात आले आहे. तसेच ‘महालक्ष्मी गोल्ड’ आणि ‘कोहिनूर डायमंड’ या पशुखाद्यांच्या मूळ विक्री दरात ५० किलो पोत्यावर ५० रुपये सवलत देण्यात आली आहे. मार्च २०२६ अखेरपर्यंत या योजनेतून दूध उत्पादकांना ५.५ कोटींचा लाभ मिळणार आहे. संस्था व्यवस्थापन खर्च ९० पैशांऐवजी १ रुपये (१० पैशांची वाढ) करण्यात आला आहे, ज्याचा ६ कोटींचा वार्षिक भार संघावर पडणार आहे. याचबरोबर गाभण जनावरांसाठी नवीन ‘महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन’ बाजारात आणण्यात आले आहे. यामुळे प्रसूती सुलभ होते, रेडके,वासरे निरोगी जन्माला येतात आणि दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. (Increase in milk purchase price from Gokul)
आज दीपावलीच्या पहिल्या दिवशी गोकुळमध्ये पारंपरिक वसुबारस पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार जयंत आसगावकर, केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक मंडळ, संघाचे अधिकारी व शेकडो महिला दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभावर पारंपरिक विधीने गायीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘गोकुळ चीज’ आणि ‘गोकुळ गुलाबजामून’ या नव्या पदार्थांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘गोकुळ आईस्क्रीम’ लवकरच बाजारात येणार असल्याचे संचालक मंडळाने जाहीर केले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने पारदर्शक व काटकसरी कारभारामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा देत म्हैस दूध खरेदी दरात तब्बल १४ रुपये तर गाय दूध खरेदी दरात आठ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. संचालक मंडळाचा पारदर्शक व काटकसरी कारभार कसा अधिक लाभदायक ठरू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी सांगितले. (Increase in milk purchase price from Gokul)
डिबेंचर्स प्रश्नी तज्ज्ञ समितीकडून अहवाल करणार
मुश्रीफ साहेब म्हणाले, “संघ सध्या डिबेंचरवर ७.८% व्याज देत असून जे शेअर्समध्ये रूपांतर झाले आहेत, त्यांना ११ % व्याज मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण करून उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ नयेत. या विषयावर संघाने पूर्ण पारदर्शकता ठेवली आहे.” डिबेंचर्स विषयावर पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “संघामार्फत सर्व दूध संस्थांना विश्वासात घेऊन, त्यांचे अभिप्राय जाणून घेण्यासाठी आणि या विषयाचा तज्ञ समितीकडून अभ्यास करून एक सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. यानंतर हा विषय कायमस्वरूपी बंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.”
आमदार सतेज पाटील म्हणाले , “गोकुळने गेल्या साडेचार वर्षांत पारदर्शक कारभार ठेवत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. दूध दरवाढ, पशुखाद्य अनुदान, संस्थेचा मार्जिन वाढविणे हे सर्व निर्णय शेतकऱ्यांसाठी केले गेले आहेत. डिबेंचर्ससह सर्व विषयांचे समन्वय साधून कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल.”
यावेळी स्वागत कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व प्रस्ताविक माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केले. आभार संचालक अभिजित तायशेटे यांनी मानले. याप्रसंगी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव उपस्थित होते. (Increase in milk purchase price from Gokul)
Attempted attack on police : पोलिस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून हल्ल्याचा प्रयत्न ; तिघांना अटक
कोल्हापूर : प्रतिनिधी : रस्ता अडवून वाढदिवस साजरा करणाऱ्यांना पोलिसांनी हटकल्यावर तिघांनी पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर धरुन हल्ल्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. (Attempted attack on police)
शहराजवळील लक्षतीर्थ वसाहतीत ही घटना घडली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी सराईत गुंड सादिक मोहम्मद पाटणकर (वय २०), अवधूत पिराजी गजगेश्वर (१९) आणि आदित्य राहुल भोजणे (२२, तिघे रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील हवालदार सामंत यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी मध्यरात्री हवालदार सामंत आणि सौरव कोळी हे दोघे कर्मचारी लक्षतीर्थ वसाहत येथे गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन गेले. शाहू चौकात काही तरुण रस्त्याच्या मध्ये दुचाकी लावून अदित्य भोजने याचा वाढदिवस साजरा करत होते. यावेळी मोठ्याने आरडाओरड सुरू होता. पोलिसांनी तरुणांना हटकले आणि रस्त्यांवर वाढदिवस साजरा करु नका असे सांगताच सादिक पाटणकर अवधूत गजगेश्वर आणि भोजणे हे शिवीगाळ करीत पोलिसांच्या अंगावर धावून गेले. यातील पाटणकर याने हवालदार सामंत यांच्या शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. भर चौकात गुंडांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा आणि कॉलर पकडण्याचा प्रकार घडल्याने सामंत यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तिन्ही हल्लेखोरांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली. अटकेतील तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मारामारी, धमकावणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, जीवघेणा हल्ला करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Attempted attack on police)