नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताने वेस्ट विंडीजविरुद्ध दुसरी कसोटी जिंकत मालिका २-० ने जिंकली. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाचा सात गडांनी पराभव केला. भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी चमक दाखवत वेस्ट विंडीजचा सलग दोनड कसोटीत पराभव करत मालिका खिशात टाकली असली तरी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत अजुनही तिसऱ्या स्थानावर आहे. (India won the series)
के.एल. राहूल नाबाद ५८
नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुध्द् दुसऱ्या कसोटीत शेवटच्या दिवशी १२१ धावांचे लक्ष्य पार करायचे होते. शेवटच्या दिवशी भारताला ५८ धावांची गरज होती. विजयासाठी असलेले माफक आव्हान सकाळच्या सत्रातच भारताने पार केले. के.एल. राहूल ५८ धावांवर तर ध्रुव जुरेल ६ धावांवर ६ बाद राहिला. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन बाद झाले.
गतवर्षी न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेत धक्कादायक पराभवानंतर भारताने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला क्लिन स्विप करत कामगिरीत सुधारणा केली आहे. पहिली कसोटी भारताने एक डाव १४० धावांनी जिंकली. दुसऱ्या कसोटीत सात गड्यांनी विजय मिळवत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. (India won the series)
कॅम्पबेल, होपची शतके
भारतीय दौऱ्यावर आलेला वेस्ट इंडिजचा संघ दुबळा असल्याची टीका होत होती. पहिल्या कसोटीत दणकून पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत इंडिज खेळाडूंना भारताचा प्रतिकार करण्याचा चांगला प्रयत्न केला. फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात वेस्ट इंडिज खेळाडू भारतीय फिरकीवर तुटून पडले. जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी शतके ठोकल्याने भारताचा विजय पाचव्या दिवसापर्यंत लांबणीवर पडला.
या कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारताना पहिल्या डाव पाच बाद ५१८ धावांवर जाहीर केला होता. यशस्वी जयस्वालने १७५ आणि कर्णधार शुभमन गिलने १२९ शतके झळकावली. वेस्ट विंडीजचा पहिला डाव २४८ धावांवर संपुष्टात आल्याने भारताने त्यांच्यावर फॉलोऑन लादला होता. कुलदीप यादवने ५ तर रवींद्र जडेजाने ३ बळी मिळवले.
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिज संघाने भारतीय गोलंदाजांचा चांगला प्रतिकार केला. सलामीवर जॉन कॅम्पबेलने १२ चौकार आणि तीन षटकार खेचत शतक झळकावून ११५ धावा केल्या. शाय होपनेही १०३ शतक झळकावले. रोसन चेसने ४० धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या शेवटच्या जोडीने भारताला चांगलेच दमवले. शेवटचा खेळाडू जायडन सेलेसने ३२ धावा केल्या तर जस्टिन ग्रिव्हेजने अर्धशतक ५० झळकावले. कुलदीप यादव आणि जसप्रितने प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराजने २ गडी बाद केले. (India won the series)

