टोकिओ : संसदीय निवडणुकीत पहिल्या फेरीत २३७ मते मिळवत साने ताकाची यांची जपानाच्या पंतप्रधानपदी निवड झाली. देशाच्या पहिल्या पंतप्रधान साने ताकाची यांचे नाव इतिहासात नाव कोरले गेले आहे. त्यांच्या विजयाने जपनाच्या शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जपानमधील एनएचके च्या नुसार जपानमधील कनिष्ठ सभागृहात ४६५ पैकी पहिल्या फेरीची २३७ मते ताकाची यांना मते मिळाली. त्यामुळे दुसरी फेरी घेतली जाणार नाही. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि जपान इनोव्हेशन पार्टी यांच्यात सरकार स्थापन करण्यासाठी युती झाल्यानंतर साने ताकाची यांची निवड झाली आहे. (Sane Takachi)
जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत लिबर डेमोक्रॅटिक पक्षाची खराब कामगिरी झाल्याने राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला होता. केवळ एक वर्षे काम केलेल्या पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी मंगळवारी मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला आणि उत्तराधिकाराचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर झालेल्या संसदीय निवडणुकीत साने ताकाची यांनी २३७ पहिल्या पसंतीची मते मिळवून पंतप्रधानपदी निवडून आल्या. पंतप्रधानपदी निवड झाल्यावर साने ताकाची एलडीपीचे किंगमेकर तारो असो यांच्या सहकाऱ्यांसह पक्ष नेतृत्वातील समर्थकासह मंत्रीमंडळ स्थापन करतील. (Sane Takachi)
जपानमध्ये कशी होते पंतप्रधानांची निवड
जपानमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहात साधे बहुमत मिळवणारा उमेदवार पंतप्रधान म्हणून निवडला जातो. पहिल्या फेरीत जो उमेदवार जास्त मते घेतो त्या उमेदवाराला विजयी घोषीत केले. जर सर्वाधीक मते मिळाली नाहीत तर मतदानाची दुसरी फेरी होती. दुसऱ्या फेरीत सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार जिंकतो. जर दोन्ही सभागृहात मतभेद असेल तर कनिष्ठ सभागृहाचा निर्णय प्राधान्याने घेतला जातो.
कोण आहेत साने ताकाची
साने ताकाची यांचा जन्म ७ मार्च १९६१ मध्ये झाला. यावर्षी २०२५ पासून त्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. आता त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान अशा दोन्ही भूमिका त्यांना पार पाडायच्या आहेत. १९९३ ते २००३ पर्यंत त्या प्रतिनिधी सभागृहाच्या सदस्या होता. २००५ पासून त्यांनी शिंजो आबे आणि फुमिया काशिदा या पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळात विविध खात्याचे मंत्रीपद भूषविले आहे. नारा गावी जन्मलेल्या ताकाची यांनी कोबे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. (Sane Takachi)