डब्लीन : श्रीमंतीच्या बाबतीत पॉप आयकॉन दुआ लिपा आणि फुटबॉल स्टार हॅरी केन यांच्या एकूण संपत्तीलाही मागे टाकणे ही कल्पना केवळ अशक्यच. पण तशी घटना घडली आहे. तीही आयर्लंडच्या माणसाच्या बाबतीत. त्याला हे भाग्य लाभले. आणि ते मिळवून दिले लॉटरीने. (Jackpot)
एका रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीने आयर्लंडचा १८ वा युरोमिलियन्स जॅकपॉट जिंकला. तो देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा जॅकपॉट समजला जातो. ‘द मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, जॅकपॉट जिंकणाऱ्याचे नाव आता द संडे टाईम्स रिच लिस्ट २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या श्रीमंतांमध्ये समाविष्ट झाले आहे.
सातत्याने लॉटरी जिंकणे ही काही सामान्य बाब नाही, पण २०८ दशलक्ष पौंड (अंदाजे २,१९४ कोटी रुपये) किमतीचा जॅकपॉट जिंकून पॉप आयकॉन दुआ लिपा आणि फुटबॉल स्टार हॅरी केन यांच्या एकूण संपत्तीलाही त्याने मागे टाकले आहे. (Jackpot)
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संबंधित व्यक्तीने आयर्लंडचा १८ वा युरोमिलियन्स जॅकपॉट जिंकला. तो देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा जॅकपॉ आहे. त्याने १३, २२, २३, ४४, ४९ आणि लकी स्टार्स ०३, ०५ या क्रमांकांसह जॅकपॉट जिंकला. त्याने जिंकलेली रक्कम आता केनसह प्रमुख सेलिब्रिटींच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. केनची एकूण संपत्ती ११५ दशलक्ष पौंड आहे आणि लिपाची अंदाजे सुमारे ११० दशलक्ष पौंड किमतीची संपत्ती आहे.
आयर्लंड नॅशनल लॉटरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सियान मर्फी यांनी लॉटरी काढलेल्यांना त्यांची तिकिटे तपासण्याचे आणि राष्ट्रीय लॉटरी मुख्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. “आम्ही आमच्या खेळाडूंना त्यांची तिकिटे तपासण्याचा सल्ला देत आहोत. लॉटरी विजेत्यांनी तिकिटाच्या मागील बाजूस सही करावी, ती सुरक्षित ठेवा आणि राष्ट्रीय लॉटरी मुख्यालयाशी संपर्क साधावा. आम्ही तुम्हाला यासंबंधीच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करू,” असे मर्फी यांनी म्हटले आहे. (Jackpot)
‘‘विजेत्या तिकिटाशी संबंधित तपशील येत्या काही दिवसांत जाहीर केले जातील. इतक्या मोठ्या विजयासह आम्हाला काही प्रक्रियांचे पालन करावे लागेल, परंतु आम्ही शक्य तितक्या लवकर कार्यक्रमाचे ठिकाण जाहीर करू. हा एक मोठा विजय असला तरी, विजेत्यासाठी तो धक्कादायक ठरू शकतो. त्यामुळे त्यांनी संयम राखावा. त्यांनी स्वतंत्र कायदेशीर आणि आर्थिक सल्ला घ्यावा आणि शक्य तितक्या लवकर आमच्याशी संपर्क साधावा,’’ असे वृत्त मर्फी यांच्या हवाल्याने ‘द मिरर’ने दिले आहे.
युरोमिलियन्स हा एक लॉटरी गेम आहे. येथे युरोपियन देशांतील खेळाडू १ ते ५० पर्यंतचे पाच क्रमांक आणि १ ते १२ पर्यंतचे दोन लकी स्टार क्रमांक निवडून मोठे जॅकपॉट जिंकू शकतात. युके नॅशनल लॉटरीच्या अधिकृत वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, तिकिटे दररोज सकाळी ६.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत ऑनलाइन उपलब्ध असतात.