नवी दिल्ली : इस्त्रायलने इराणवर क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला आहे. त्यामुळे मध्यपर्वेत पुन्हा अशांतता माजणार आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत. इराणवर अमेरिका हल्ला चढवणार अशी शक्यता असताना इस्त्रालयने हल्ला केल्याने मध्यपूर्वेत युद्धाचे ढग जमा झाले आहे.
हल्ल्यानंतर इस्त्रायलचे संरक्षण मंत्री काटझ् यांनी देशभरात आणीबाणीची घोषणा केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या तेहरानजवळील कार्यालयाजवळ स्फोट झाल्याचे वृत आहे. तेहरानच्या मध्यभागी धुराचे लोट उठताना दिसत आहेत. इराणी सरकारी टेलिव्हिजनने स्फोट झाल्याची कबुली दिली आहे. इराणमध्ये हवाई क्षेत्र बंद झाले आहे. (Israel attacks Iran)
इस्त्रायलने हल्ला चढवल्यानंतर प्रतिहल्ला होण्याची शक्यता लक्षात इस्त्रायलने सायरन वाजवले. नागरिकांना अत्यंत गंभीर धोक्याची सूचना देणारे फोन अलर्ट मिळाले आहेत.
इराणच्या अणुकार्यक्रमावरुन अमेरिकेने दबाव वाढवला आहे. अमेरिकेने आखात लढाऊ विमाने आणि युद्धनौकांचा ताफा तैनात केला आहे. अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना इस्त्रायल सोडण्यास परवानगी दिली आहे, असे वृत्त सीबीएसने दिले आहे. (Israel attacks Iran)
गुरुवारी जिनिव्हामध्ये अमेरिका आणि इराणमध्ये अणुकरारावरुन वाटाघाटी सुरू होत्या. चर्चेची तिसरी फेरीही झाली होती. पण त्यात काही निर्णय झाला नाही. त्यानंतर आज इस्त्रायलने इराणवर हल्ला चढवला आहे.
दोनच दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलला भेट दिली होती. इस्त्रायलचे प्रमुख बेंजामिन नेत्यानाहू यांच्याबरोबर चर्चा झाली. भारत आणि इस्त्रायलमध्ये करार झाले आहेत. पंतप्रधान मोदी भारतात परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इस्त्रायलने इराणवर हल्ला चढविला आहे. तर दुसरीकडे भारताच्या सीमेवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या युद्धाला तोंड फुटले आहे. (Israel attacks Iran)