नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड संघातील क्रिकेट मालिकेतील शेवटचा पाचवा कसोटी सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे गुरुवारी ३१ जुलैपासून सुरू होत आहे. भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडूंना दुखापतींना सामोरे जावे लागले असल्याने संघात मोठे बदल झाले आहेत. इंग्लंडचा कर्णधार दुखापतीमुळे संघाच्या बाहेर गेला असून ऑली पोत इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. भारतीय संघाचा उप कर्णधार ऋषभ पंतही जखमी असल्याने त्याची जागा ध्रुव जरेल घेणार आहे. जसपित बुमराह शेवटचा कसोटीत खेळणार का हे सामना सुरू होण्यापूर्वी कळणार आहे. अर्शदीप सिंगला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंडने त्यांच्या संघात चार बदल केले आहेत. जेकेब बेथेल, गस अटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग यांचा समावेश केला आहे. (Ollie Pope)
इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथे होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज होत असताना, सर्वांच्या नजरा मोहम्मद सिराजवर आहे. सिराज २०० आंतरराष्ट्रीय विकेट्सचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यापासून फक्त एक विकेट दूर आहे. हा टप्पा लंडनमध्ये येऊ शकतो.
शेवटच्या कसोटी सामन्यात भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळेल का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार शुभमन गिलला विचारण्यात “आम्ही उद्या निर्णय घेऊ.” असे त्याने सांगितले. बुमराहने तीन सामन्यात १४ बळी घेतले. तथापि, ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याला लय आणि वेग मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. नियमित यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्याची जागा ध्रुव जुरेल घेईल. (Ollie Pope)
इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स बायसेप्स टेंडनच्या दुखापतीमुळे ओव्हल येथे होणाऱ्या भारताविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे, ज्यामुळे इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल करण्यात आले आहेत. इंग्लंडच्या निवड समितीने बुधवारी संघातील बदलांची घोषणा केली, ज्यामध्ये जेकब बेथेल, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंगू यांचा समावेश आहे .स्टोक्सच्या अनुपस्थितीत, कर्णधारपदाची जबाबदारी ऑली पोपकडे सोपवण्यात आली आहे. (Ollie Pope)
भारताचा संभाव्य संघ : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (क), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव , आकाश दीप, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
इंग्लंडचा संघ : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.