नागपूर; विशेष प्रतिनिधी : बीड आणि परभणीतील घटनांबाबत मुख्यमंत्री ठोस कारवाई करतील अशी अपेक्षा असताना त्यांनी केवळ गोल गोल फिरवले आहे. मंत्री धनंजय मुंडे, सिरीयल किलर वाल्मिकी कराड व परभणीतील मारहाण करणाऱ्या पोलिसांना वाचविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. असा आरोप, असा आरोप महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला. (Dhananjay Munde)
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत दिलेल्या उत्तराला पॉईंट ऑफ रिप्लाय अंतर्गत बोलण्यास न दिल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध करीत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर प्रवेशद्वाराच्या पायऱ्याजवळ पत्रकारांची बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नितीन राऊत, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर आरोप केले. नितीन राऊत म्हणाले की, परभणीतील सूर्यवंशी या दलित तरुणांच्या पोलिसांकडून मारहाणीत मृत्यू झाल्याचे पीएम रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री पोलिसांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. दलित आंदोलकांना खोटे ठरवित आहेत. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा व्हिडिओ उपलब्ध आहे, तरीही मुख्यमंत्र्यांनी याबाबत चुकीचे वक्तव्य करून पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला. बीडमध्येही त्यांनी तसेच उत्तर द्यायचे होते पण विधानसभा अध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नाही.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हे सर्वकाही सरळ आणि स्पष्ट असतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे स्पष्टता नसल्याचा टोला लगावला. मुख्यमंत्री, मंत्री धनंजय मुंडे, त्यांचे गुंड साथीदार वाल्मिकी कराड, वाल्मिकींना वाचवत आहेत. तो मारेकरी आहे असे मुख्यमंत्री म्हणतात. या प्रकरणात त्यांचा आणि धनंजय मुंडेंचा काही सहभाग नाही का? (Dhananjay Munde)
त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून लढू!
आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारचा हेतू काय आहे, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, त्यांना आरोपी वाचवायचे आहेत, पण आम्ही अन्यायाविरुद्ध लढत राहू, महाराष्ट्र वाचवण्याचा लढा सुरूच राहील. सत्ताधारी भाजपचे बीडचे आमदार सुरेश धस म्हणाले की, याप्रकरणी मंत्री मुंडेंवर आरोप होत आहेत, ते शांत बसले आहेत, त्यांनी पुढे येऊन उत्तर द्यायला हवे.’
हेही वाचा :