बर्मिंगहॅम : एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडने भारताला पहिल्या डावात चोख प्रत्युत्तर दिले आहे. संघाची स्थिती पाच बाद ८५ अशी अडचणीची असताना हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ यांनी दमदार शतके ठोकत भारताच्या ५६७ धावांना आव्हान देताना चहापानाला खेळ थांबला तेव्हा ५ बाद ३५५ धावा जमवल्या आहेत. स्मिथ १५६ असून हॅरी ब्रूक १३८ धावांवर खेळत आहे. (Brook Smith’s century)
आज दुसऱ्या कसोटीच्या मोहम्मद सिराजने जो रूट आणि बेन स्टोक्स यांना सलग चेंडूंमध्ये बाद केल्यानंतर सकाळच्या सत्रात इंग्लंडची अवस्था ५ बाद ८४ अशी झाली होती. स्टोक्स त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला गोल्डन डक ठरला. परंतु १२ वी कसोटी खेळणाऱ्या विकेटकीपर-फलंदाज स्मिथने लंचपूर्वी फक्त ८० चेंडूत नाबाद शतक झळकावून खेळाचे चित्र बदलले. त्याच्या खेळीत १४ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
त्याला हॅरी ब्रूकमध्ये एक निर्भय जोडीदार सापडला, ज्याने नाबाद ९१ धावा केल्या आणि या जोडीने सहाव्या विकेटसाठी १६५ धावांची जबरदस्त भागीदारी केली. स्मिथचे शतक आता इंग्लंडच्या कसोटीतील सर्वात जलद शतकांपैकी एक आहे, जे २०२२ मध्ये ब्रूकच्या पाकिस्तानविरुद्धच्या ८० चेंडूंच्या शतकाशी बरोबरी करते. फक्त गिल्बर्ट जेसॉप आणि जॉनी बेअरस्टो हे तीन आकड्यांपेक्षा कमी धावा करू शकले आहेत. उपहाराला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ५ बाद २५५ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली होती. जेमी स्मिथ १०६ धावांवर तर हॅरी ब्रुक ९३ धावांवर खेळत होता. (Brook Smith’s century)
उपहारानंतर हॅरी ब्रुकच्या शतकाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ब्रुकने चौकार मारत शतक झळकावत एक संयमी खेळीचे दर्शन घडवले. उपहारानंतरच्या खेळावर ब्रुक आणि स्मिथच्या फलंदाजी छाप होती. दोघांनी १९२ चेंडूत नाबाद २०० धावांची भागीदारी पूर्ण केली. ५८ व्या षटकात इंग्लंडने ३०० धावांचा टप्पा पूर्ण केला. आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर त्यांनी हल्ला चढविला. स्मिथ तर आक्रमक खेळत होता. नितीश रेड्डीच्या सलग दोन चेंडूवर दोन चौकार मारले. आकाश दीपला मिड विकेटमधून चौकार खेचला. ६४ व्या षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर एक धाव घेत दीड शतक साजरे केले. त्याने १४४ चेंडूत १५० धावा जमवल्या. चहापानाला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ५ बाद ३२७ धावा केल्या. स्मिथ १५३धावावर तर ब्रुक १२३ धावांवर खेळत होते. (Brook Smith’s century)