नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे सोमवारी (४ ऑगस्ट) नवी दिल्ली येथे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. आजारपणामुळे एक महिन्याहून अधिक काळ ते अंथरुणाला खिळून होते. (SHIBU SOREN PASSES AWAY)
झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री आणि शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी निधनाची घोषणा केली. त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आदरणीय दिशाम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत.’’ शिबू सोरेन झारखंडमध्ये ‘दिशाम गुरुजी’ म्हणून प्रसिद्ध होते.(SHIBU SOREN PASSES AWAY)
सोरेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. “श्री शिबू सोरेन हे तळागाळातील नेते होते. सार्वजनिक जीवनात काम करत असताना त्यांची जनतेप्रती अढळ निष्ठा होती. आदिवासी समुदाय, गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याबाबत ते विशेषतः उत्साही होते. माझ्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहेत.(SHIBU SOREN PASSES AWAY)
जूनच्या शेवटच्या आठवड्यात सोरेन यांना नवी दिल्लीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. किडनीशी संबंधित गुंतागुंतीमुळे शिबू सोरेन यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात एका महिन्यापेक्षा जास्त काळ दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ञांच्या देखरेखीखाली होते.(SHIBU SOREN PASSES AWAY)
११ जानेवारी १९४४ रोजी सध्याच्या झारखंडमधील रामगडजवळ जन्मलेले शिबू सोरेन हे संथाळ आदिवासी समुदायाचे होते. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला आदिवासींच्या जमीन हक्कासाठी त्यांनी मोठा लढा उभारला. १९७३ मध्ये बिहारपासून वेगळे आदिवासी राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ची सह-स्थापना केली.
१९८० मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आलेले शिबू सोरेन संसदेत अनेक वेळा राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले. १९८७ मध्ये, ते झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष झाले. जवळपास ३८ वर्षे त्यांनी हे पद भूषवले.
Hemant Soren
रांची : वृत्तसंस्था : हेमंत सोरेन यांनी गुरुवारी संध्याकाळी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोरेन शपथ घेतल्यानंतर लगेचच ‘ॲक्शन मोड’मध्ये दिसत आहेत. सोरेन यांनी जाहीर केले, की मैया सन्मान योजनेंतर्गत आता प्रत्येक महिला लाभार्थीच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला २,५०० रुपये जमा केले जातील.
आतापर्यंत या योजनेंतर्गत १८ ते ५० वयोगटातील महिलांना सरकार एक हजार रुपयांची आर्थिक मदत देत असे. ती आता २५०० रुपये करण्यात आली आहे. सोरेन म्हणाले, की डिसेंबरपासून या योजनेंतर्गत प्रत्येक महिला लाभार्थीला २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. आता डिसेंबरपासून दरमहा महिला लाभार्थीच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती. झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) नेतृत्वाखालील सरकारने या वर्षीच्या निवडणुकीपूर्वी ऑगस्ट महिन्यात ही योजना सुरू केली होती. राज्यातील ५० लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकारकडे १.३६ लाख कोटी रुपयांची थकबाकी देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने २००५ पासून राज्यातील खनिजांवर एकूण एक लाख ३६ हजार कोटी रुपयांची रॉयल्टी मागितली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने खनिज रॉयल्टीवर राज्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. सोरेन म्हणाले, की झारखंड सरकार कोळशाची थकबाकी वसूल करण्यासाठी केंद्र सरकारवर कायदेशीर कारवाई करेल. शिष्टमंडळ आसाममध्ये राहणाऱ्या झारखंडींच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. आपल्या पहिल्या बैठकीच्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांना देताना सोरेन म्हणाले, की आसाममध्ये झारखंडच्या आदिवासींना उपेक्षित केले जात आहे. झारखंडमधील मूळ रहिवासी मोठ्या संख्येने तेथे राहतात. आम्ही ठरवले आहे, की सर्वपक्षीय शिष्टमंडळ तेथील भूस्थितीचा अभ्यास करेल. हे शिष्टमंडळ आपला अहवाल झारखंड सरकारला सादर करणार आहे.
महाराष्ट्रातील महायुतीचा दणदणीत विजय आणि महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाच्या चर्चेत झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या देदीप्यमान यशाची देशभरातील सगळ्याच माध्यमांनी उपेक्षा केली. झारखंड हे महाराष्ट्राच्या तुलनेने छोटे राज्य आहे आणि राष्ट्रीच पातळीवर दखल घेण्याजोगे फारसे नेते त्या राज्यात नाहीत, हे खरे असले तरी हेमंत सोरेन यांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भाजपच्या यंत्रणेशी मुकाबला करून सत्ता टिकवली, हे वादळात दिवा लावण्यासारखे आहे. त्याअर्थाने विचार केला तर दोन राज्यांच्या निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडीला प्रत्येकी एकेक राज्याची सत्ता मिळाली आहे. म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील निवडणुकीचा सामना एक-एक असा बरोबरीत झाला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतच्या नेत्यांच्या कौतुकाचे पूल बांधण्याच्या नादात झारखंडचा विषयच मागे ढकलण्यात आला. खरेतर महाराष्ट्रात जसा काँग्रेस-राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांच्या महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे, त्याचप्रमाणे झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि एनडीएचा पराभव झाला आहे, हे अधोरेखित होण्याची गरज आहे. निवडणूक प्रचार काळातही महाराष्ट्राच्या निवडणुकीची चर्चा जास्ती झाली आणि ती होणे स्वाभाविक आहे. त्यात पुन्हा महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशी एकाहून एक दिग्गज नेतेमंडळी राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असल्यामुळे महाराष्ट्राला झुकते माप मिळाले. झारखंडमध्ये मात्र मुख्यमंत्री हेमंत सोरेन हेच एकमेव राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाणारे नेते प्रमुख नेते आहेत. सध्याचा जमाना व्यक्तिकेंद्री राजकारणाचा असल्यामुळे राजकारण व्यक्तिंभोवती फिरते आणि त्याचा फायदा सध्याच्या राजकीय चर्चेत महाराष्ट्राला मिळतो.
झारखंडही छोटे असले तरी तिथला संघर्ष मोठा होता. राज्य छोटे असले तरी जगातील मोठ्या पक्षाचे शीर्षस्थ नेते ते राज्य आपल्या ताब्यात घेण्यासाठी किती जिवाचा आटापिटा करीत होते, हे गेल्या वर्षभरात देशाने पाहिले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर अटकेत गेलेले दुसरे मुख्यमंत्री हेमंत सोरेन होते. केजरीवाल यांनी अटकेत जाऊनही मुख्यमंत्रिपद सोडले नाही आणि सोरेन यांनी मात्र ताबडतोब राजीनामा दिला आणि चंपई सोरेन या आपल्या ज्येष्ठ सहका-याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. चंपई सोरेन यांची जबाबदारी अर्थातच वनवासात गेलेल्या रामाच्या पादुका सांभाळणा-या भरताएवढीच होती. त्यामुळे हेमंत सोरेन यांची सुटका झाल्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र परिस्थितीचे आकलन करून घेण्याची समज चंपई सोरेन यांच्याकडे नव्हती. त्यांचा अहंकार दुखावला. परिस्थितीचा फायदा घेऊन भाजपने त्यांच्यावर जाळे टाकले आणि तेही त्यात अलगद सापडले. स्वाभिमान दुखावल्याचे कारण सांगून त्यांनी आपल्या पक्षाशी फारकत घेऊन भाजपशी गाठ मारली. बिहारमध्ये काही वर्षांपूर्वी नीतिश कुमार यांनी जीतनराम मांझी यांच्याकडे जबाबदारी दिली होती, तेही अशाच रितीने भाजपच्या कच्छपी लागले. झारखंडमध्ये त्याचीच पुनरावृत्ती झाली. चंपई सोरेन यांना कोल्हान टायगर म्हटले जाते. म्हणजे कोल्हान प्रदेशात त्यांचे वर्चस्व असल्याचे मानले जात होते. ते आपल्याकडे आले म्हणजे आदिवासी मतांची बेरीज होईल आणि आजवर जे जमले नाही ते शक्य होईल, अशी भाजपची धारणा होती. चंपई यांना हेमंत सोरेन यांनी पद दिल्यामुळे ते मुख्यमंत्री झाले, त्यांची तेवढी कुवत नव्हती आणि राजकीय प्रभावही नसल्याचे निवडणूक निकालानंतरस्पष्ट झाले आहे.
झारखंडमध्ये २०१९च्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाला ३०, काँग्रेसला १६ तर राष्ट्रीय जनता दल आणि माकपला प्रत्येकी एकेक जागा मिळाली होती. भाजपला २५ जागा मिळाल्या होत्या. यावेळच्या निवडणुकीत तसाच पारंपरिक मुकाबला होत आहे. विधानसभेच्या ८१ जागा असलेल्या झारखंडमध्ये भाजपला २१ म्हणजे गेल्यावेळेपेक्षा चार जागा कमीच मिळाल्या आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाला ३४, काँग्रेसला १६, राष्ट्रीय जनता दलाला चार जागा मिळाल्या असून चांगल्या बहुमताने इंडिया आघाडी तिथे सत्तेवर आली आहे. आदिवासी राज्यावर कब्जा करण्याचा डाव हेमंत सोरेन यांनी उधळून लावला आहे. लोकसभा निवडणुकीत आदिवासीबहुल पाचही जागांवर भाजपचा पराभव झाला होता. विधानसभेला ते चित्र बदलण्यासाठी भाजपने आटोकाट प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना सपशेल अपयश आले. या अपयशाची चर्चाही नीटपणे व्हायला पाहिजे होती, परंतु त्यात कुणाला रस नाही
झारखंड विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. मंगळवारी २६ नोव्हेंबरला त्यांचा शपथविधी होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच झारखंडचीही निवडणूक झाली. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने दणदणीत विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये मात्र सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने भाजपचा पराभव केल्याने सोरेन सध्या अधिक चर्चेत आहेत. झारखंडमधील निवडणूकीला एक वेगळीच पार्श्वभूमी होती. कारण मुख्यमंत्रीपदावर असताना सोरेन यांना ईडीने एका जमीन गैरव्य्वहार प्रकारणात अटक केली होती. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही झाला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडल्यानंतर त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून चंपाई सोरेन यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपवली होती. तथापि त्यानंतर काही नाट्यमय घडामोडी झाल्या. हेमंत सोरेन यांचं तुरुंगातून सुटणं, पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणं, त्यामुळे चंपाई सोरेन यांची नाराजी व पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश करणं, या सगळ्या घटनांमुळे संपूर्ण देशाचं लक्ष झारखंड मधील घडामोडींनी वेधून घेतल होत. त्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील निवडणूक झाली होती. हेमंत सोरेन यांनी त्यात बाजी मारली त्यामुळे राज्याची सत्तासूत्रे पुन्हा एकदा त्यांच्या हाती आली आहेत.
झारखंड हा पूर्वी बिहारचा भाग होता. विभाजन होवून नव्याने राज्याची निर्मिती झाल्यानंतर विद्यमान सत्ताधारी दुसऱ्यादा सत्तेवर येण्याची घटना यंदाच्या निवडणूक निकालाने प्रथमच होत आहे. राजकारणाचा वारसा हेमंत सोरेन यांना कुटुंबाकडून मिळाला. त्यांचे वडील शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक. राज्यातील सर्वात प्रभावी व शक्तीशाली पक्ष म्हणून या पक्षाकडे पाहिले जाते. हेमंत सोरेन यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९७५ ला हजारीबागजवळच्या नेमरा गावात झाला. हायस्कूल व त्यानंतरचे सुरवातीचे महाविद्यालयीन शिक्षण पाटण्यात झाले. इंजिनिअर बनण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यामुळे मेसरा येथील बिर्ला इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्र वेशही घेतला पण काही कारणांनी सदरचे शिक्षण मध्येच त्यांनी सोडले व वडील शिबू सोरेन यांच्या पावलावर पाऊल टाकत सामाजिक कार्यात भाग घेवू लागले. त्यावेळी राजकारणापासून मात्र ते दूर राहिले होते . शिबू सोरेन यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून त्यांचा थोरला मुलगा दुर्गा सोरेन यांच्याकडे पाहिले जात होते. तथापि दुर्गा सोरेन यांच्या आकस्मिक निधनानंतर हेमंत सोरेन तत्कालिन परिस्थितीमुळे आपसूक राजकारणात आले. २००९ ते २०१० या कालावधीत त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. २०१३ मध्ये ते काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या पाठिंब्यावर राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. मात्र २०१४ च्या निवडणूकीत त्याना पराभवाचा सामना करावा लागला. २०१९ ची निवडणूक मात्र त्यांचे पुनरागमन करणारी ठरली . काँग्रेस व राजदच्या पाठिंब्यावर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. मात्र त्यांची ही कारकीर्द वादग्रस्त ठरली. जमीन घोटाळा प्रकरणात अवैध धनस्त्रोताचा वापर केल्याचा ठपका आल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले व तुरुंगवासही झाला. जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी भाजपविरुध्द राजकीय संघर्ष् करत २०२४ च्या निवडणूकीत निर्विवाद यश संपादन केले. त्यांच्या नेतृत्वाची लोकप्रियता सिध्द करणारा हा विजय मानला जात आहे. ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चाला ३४ तर आघाडीतील अन्य पक्षांपैकी काँग्रेस १६, राजद -४, सीपीआय (एमएल) २ अशा तब्ब्ल ५६ जागा मिळाल्या आहेत.
झारखंड; वृत्तसंस्था : झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चासह इंडिया आघाडीने ५६ जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे, तर भाजपने २४ जागांवर आघाडी घेतली. झारखंड मुक्ती मोर्चाला ३४ च्या दरम्यान, तर काँगेसला १६ जागा मिळाल्या.
बहुमत मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले, की मला सर्व समाजातील लोक, शेतकरी, महिला आणि तरुणांचे आभार मानायचे आहेत. मी इथे उपस्थित असलेल्या नेत्यांचेही आभार मानतो. आम्ही पूर्ण निकालाची वाट पाहत आहोत. यानंतर आम्ही पुढील पाऊल उचलू आणि निर्णय घेऊ. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन म्हणाल्या की, गांडेयमधील लोकांनी माझ्यावर मुलीसारखे प्रेम केले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहो, हीच प्रार्थना
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या मुलासोबतचा फोटो शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, माझी ताकद माझी पत्नी कल्पना सोरेन यांनी विजय मिळवला.
नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
झारखंड निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधानांनीही प्रतिक्रिया दिली आहे. झारखंड निवडणुकीत जेएमएमच्या विजयाबद्दल हेमंत सोरेन यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले की, “झारखंडच्या जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. लोकांचे प्रश्न मांडण्यात आणि राज्यासाठी काम करण्यात आम्ही नेहमीच सगळ्यांच्या पुढे राहू, राज्यातील कामगिरीबद्दल मी जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडीचे अभिनंदन करतो.”
दोन टप्प्यांत झाले होते मतदान
झारखंड विधानसभेच्या ८१ मतदारसंघांसाठी १३ आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान झाले. यावेळी मतदानाची टक्केवारी ही ६८ टक्के इतकी होती. ती आतापर्यंतची सर्वाधिक टक्केवारी आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेएमएमने ३०, काँग्रेस १६ आणि आरजेडीने एक जागा जिंकली, तर भाजपला २५ जागा मिळाल्या होत्या.
रांची : झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर ‘इंडिया’ आघाडीच्या पक्षांमध्ये एकमत झाले आहे. या संदर्भात (दि.१९) दुपारी रांचीमध्ये आघाडीच्या पक्षांची बैठक झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जागावाटपाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की राज्यातील ८१ विधानसभा जागांपैकी ७० जागा काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चामध्ये विभागल्या जातील, तर उर्वरित ११ जागा इतर मित्रपक्षांसाठी सोडल्या जातील. (Hemant Soren)
पत्रकार परिषदेत त्यांनी असेही सांगितले, की या विधानसभा निवडणुकीत डावे पक्षही ‘इंडिया’ आघाडीच्या बॅनरखाली लढतील. याचा अर्थ असा की ७० जागांनंतर बाकीच्या ११ जागांवर डावे आणि राष्ट्रीय जनता दलासारखे इतर सहयोगी आपले उमेदवार उभे करतील. मात्र, कोणता पक्ष किती जागा लढवणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. पत्रकार परिषदेत सोरेन म्हणाले, की आम्ही ‘इंडिया’ आघाडीचे लोक ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेत आहोत आणि प्रत्येक पैलू लक्षात घेऊन या निवडणुकीत एकत्र उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Hemant Soren)
ते पुढे म्हणाले, ‘झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलासोबत आणखी एक सहयोगी या आघाडीत सामील होत आहे. डावे पक्षही आता या आघाडीत सहभागी होणार आहेत. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ठरलेल्या गोष्टी म्हणजे राज्यातील ७० जागांवर ‘इंडिया’ आघाडीचे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे उमेदवार असतील आणि उरलेल्या विधानसभांपैकी कोणत्या जागेवर कोण निवडणूक लढवणार याबाबत आम्ही त्यांच्याशी बसून चर्चा करू.
हेही वाचा :