महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुणे जिल्हातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची आज (दि.२) घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. खराब वातावरणामुळे ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन आणि रूग्णवाहिका दाखल झाल्या. ऑगस्टा १०९ असे दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे नाव आहे. (Helicopter Crash In Pune)
या घटनेत हेलिकॉप्टरमधील दोन पायलट आणि एका विमान अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. कॅप्टन पिल्ई
आणि कॅप्टन परमजीत हे दुर्घटनेमधील हेलिकॉप्टरचे कॅप्टन होते. याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) अधिकाऱ्याने दिली आहे.
‘त्या’ हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
पुणे जिल्ह्यातील बावधन येथील डोंगराळ भागात सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरने गोल्फ कोर्सवरील हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर पुण्यातील हेरिटेज एव्हिएशनचे होते. त्याचा नोंदणी क्रमांक VT EVV असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेसने भाड्याने घेतले होते आणि ते मुंबईच्या दिशेने चालले होते. सुनील तटकरे ह्या हेलिकॉप्टरने रायगडला जाणार होते, असे वृत्त आहे. (Helicopter Crash In Pune)
महिन्याभरात हेलिकॉप्टर कोसळण्याची दुसरी घटना
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. २४ ऑगस्ट रोजी जुहू येथून हैदराबादकडे निघालेले हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे पौड परिसरात कोसळले होते. या अपघातात पायलट किरकोळ जखमी झाला होता. तर अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
🚨🇮🇳 #BREAKING
HELICOPTER CRASH IN PUNE
3 Dead, 2 Pilots and Engineer Among Victims
A helicopter crashed in Bavdhan, Pune, amid dense fog, claiming the lives of 3 individuals.
– Cause: Suspected fog-related visibility issued #HelicopterCrash pic.twitter.com/RalMUJoWE8
— Weather monitor (@Weathermonitors) October 2, 2024
हेही वाचा :