गुवाहाटी : गुवाहाटी शहराच्या काही भागांसह कामरूप (मेट्रो) जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी धुवाँधार सुरू आहे. पावसामुळे झालेल्या भूस्खलनात मुलांसह किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. (Heavy Rain hit Guwahati)
भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांमध्ये पूनम गोस्वामी, तिची अल्पवयीन मुलगी आणि आणखी एक अल्पवयीन नातेवाईक यांचा समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी शहरातील बोंडा भागात त्यांच्या घरावर भूस्खलन झालेला काही भाग कोसळल्याने ही दुःखद घटना घडली.
कामरूप (मेट्रो) येथे पाच मृत्यूंची पुष्टी करताना, आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) शनिवारी सकाळच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, राज्यातील एकूण तीन जिल्हे सध्या शहरी पुराचा सामना करत आहेत. (Heavy Rain hit Guwahati)
एएसडीएमएच्या अहवालात म्हटले आहे की शहरी पुरामुळे प्रभावित झालेले कामरूप, कामरूप (मेट्रो) आणि कछार या तीन जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. एकूण १०,१५० लोक प्रभावित झाले आहेत.
शिवाय, धेमाजी, लखीमपूर आणि गोलाघाट आणि तेथील आठ महसूल मंडळे पुरामुळे बाधित झाली आहेत, असे एएसडीएमएने म्हटले आहे. (Heavy Rain hit Guwahati)
शनिवार सकाळपासून विविध जिल्ह्यांत मुसळधार सुरू आहे. अशा पावसातही एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल राज्यातील सर्वांत जास्त पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मदत करत आहेत.
प्रादेशिक हवामान विभागाच्या शुक्रवारच्या अहवालानुसार, चिरांग, बक्सा, बारपेटा, बोंगाईगाव, बाजाली, तामुलपूर, दरंग आणि उदलगुरी येथे शनिवारी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
शुक्रवार, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ईशान्येकडील भागात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरणामुळे सतत पाऊस पडत असल्याने १८ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ अंतर्गत ‘असामान्य परिस्थिती’ जाहीर केली.
“उद्याही परिस्थिती अशीच राहील. राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. उद्या, कामरूप आणि कामरूप (मेट्रो) मध्ये, सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष कॅज्युअल रजा मिळेल, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवली जातील आणि खाजगी आस्थापनांनाही त्यानुसार उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे,” असे मुख्यमंत्री शर्मा म्हणाले. (Heavy Rain hit Guwahati)
अरुणाचल प्रदेश आणि मेघालयात झालेल्या मुसळधार पावसामुळे आसाममधील परिस्थिती, विशेषतः गुवाहाटीत ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
लांब अंतरावरून कामावर जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या कामरूप आणि कामरूप महानगर जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवारी विशेष कॅज्युअल रजा देण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यांनी शनिवारी शैक्षणिक उपक्रम स्थगित केले आहेत.
हेही वाचा :
निवृत्तीचे वय निश्चित करण्याचा अधिकार राज्याला
भाजपच्या माजी नेत्याच्या मुलासह तिघांना सक्तमजुरीची शिक्षा