राजकोट : दारुबंदी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात विषारी दारु प्यालेने सहा जणांना मृत्यू झाला आहे. अन्य २५ जणांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस दलात निवड झाल्याबददल आयोजित केलेल्या पार्टीत ही घटना घडली. दारुबंदी असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याच राज्यात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (Six people died after consuming toxic liquor in Bhavnagar)
भावनगर जिल्ह्यातील घोघा तालुक्यातील खारकवाडी गावात पार्टीदरम्यान ही घटना घडली. विश्वराजसिंह याची पोलिस दलात निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी पार्टीचे आयोजन केले होते. भारतीय बनावटीच्या रॉयल स्टॅग बाटलीतील विषारी दारु प्यालयाने सहा जणांना मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारा भावनगर येथील सर टी रुग्णालयात २५ वर्षीय उपेंद्रसिंह गोहिल याचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिस दलात निवड झालेल्या विश्वराजसिंह यांची प्रकृती गंभीर झाली आहे. कार्तिक मकवाना आणि घनश्यामसिंह जडेजा अशी मयत झालेल्या व्यक्तींची ओळख पटली आहे. (Six people died after consuming toxic liquor in Bhavnagar)
ही दारु भावनगरमध्येच तयार करुन विकली जात होती. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेशातील रहिवासी नरेंद्र यादव हा भेसळयुक्त दारुच्या रॅकेटचा सुत्रधार असल्याची माहिती पुढे आली आहे. (Six people died after consuming toxic liquor in Bhavnagar)