नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने त्यांच्यावर पिस्तूलचे दोन गोळ्या झाडल्या. पण त्यातून ते बचावले आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे ते वडील आहेत. घटनास्थळी पिस्तूलातून गोळ्या झाडणाऱ्या ६३ वर्षीय कमलसिंग जामवाल यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न का केला याचा तपास पोलिस प्रशासन करत आहे.
जम्मू येथील ग्रेटर कैलाश भागात झालेल्या एका विवाह समारंभात शुभेच्छा देण्यासाठी फारुख अब्दुल्ला गेले होते. त्यांच्यासोबत जम्मू काश्मीरचे उप मुख्यमंत्री सुरिंदर चौधरी होते. कार्यक्रम स्थळावरुन बाहेर पडत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर पिस्तूलातून गोळ्या झाडल्या. त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांनी सुरक्षितरित्या कारमध्ये बसवून घटनास्थळावरुन हलवण्यात आले. (Farooq Abdullah was shot with a pistol)
यावर प्रतिक्रिया देताना फारुख अब्दुल्लांनी परमेश्वराचे आभार मानले. सुरक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले. या विवाह समारंभासाठी अनेक मोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या पण पोलिस उपस्थित होते. या घटनेंनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फारुख अब्दुल्ला यांच्याशी संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस कली. या प्रकराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. (Farooq Abdullah was shot with a pistol)
मुख्यमंत्री ओमल अब्दुल्ला यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये असले म्हटले आहे की, अल्लाह दयाळू आहे. लोडेड पिस्तूल असलेला एक माणूस अगदी जवळून आत जाऊन गोळीबार करण्यात यशस्वी झाला. केवळ जवळच्या संरक्षण पथकाने गोळीबार रोखला आणि हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला याची खात्री केली. सध्या उत्तरांपेक्षा जास्त प्रश्न आहेत ज्यात Z+ NSG संरक्षित माजी मुख्यमंत्र्यांच्या इतक्या जवळ कोणी कसे पोहोचू शकले, हे समाविष्ट आहे परंतु मर्यादित नाही,” (Farooq Abdullah was shot with a pistol)