मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवारी २२ जुलै वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना दीघायुरारोग्य चिंतिले आहे. (Pawar, Uddhav praise Fadnavis)
यातच त्यांचे विरोधक आणि ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांनीही फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळणारे लेख लिहिले आहेत. यशस्वी राजकीय नेता आणि अभ्यासू राजकारणी असा त्यांचा उल्लेख केला आहे. (Pawar, Uddhav praise Fadnavis)
शरद पवार यांनी फडणवीस यांच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय केवळ त्यांचेच आहे, असे आपल्या लेखात म्हटले आहे. त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातून मिळाले असले तरी वडिलांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरून पुन्हा उभे राहणे आणि नेटाने पुढे जाणे आव्हानात्मक होते, ते आव्हान त्यांनी पेलले आणि यशस्वी झाले आहेत, असे पवार यांनी म्हटले आहे.
हजरजबाबी आणि संवादकुशल : शरद पवार
फडणवीस कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल आहेत. मी त्यांच्याकडे विविध विषयांची उत्तम जाण असणारा, प्रशासनावर मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून पाहतो, असे पवार यांनी म्हटले आहे. (Pawar, Uddhav praise Fadnavis)
त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य आहे ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानाही आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी ही खरोखरच वाखाणण्याजोगी होती. या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांच्या गळ्यात अगदी तरुण वयात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला, असे कौतुकोद्गारही पवार यांनी काढले आहेत.
प्रामाणिक आणि हुशार राजकारणी : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, देवेंद्र महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजेच २०१४ ते २०१९ आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. नंतरच्या काळात त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची धडपडही जवळून पाहता आली. देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. (Pawar, Uddhav praise Fadnavis)
देवेंद्र फडणवीस यांनी मराठी पुस्तकं लिहिली, ज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे. त्यांच्या वडिलांना आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला होता, ज्यामुळे त्यांच्यावर राजकीय संस्कार खोलवर झाले. या पार्श्वभूमीवरही त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. फडणवीस यांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत केला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा-शिवसेना युती सरकारने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणं राबवली. फडणवीस यांना राजकीय कारकिर्दीत अनेकदा विविध विषयांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्यांनी आपल्या अभ्यासू आणि मुत्सदी स्वभावाने या आव्हानांचा सामना केला, असा उल्लेखही ठाकरे यांनी आपल्या लेखात केला आहे.
हेही वाचा :
सरकार भिकारी; कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त विधान!
६४ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी चंदा कोचर दोषी