कोल्हापूर : प्रतिनिधी : नशेची इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. तेजस उदयकुमार महाजन (वय ३५.रा.शिवाजी पार्क,कोल्हापूर) आणि विवेक शिवाजी पाटील (वय ३०.रा.माळीवाडी,उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. नशा आणणारी मेफेनटर्माइन सुफ्लिफिटची ७५ इंजेक्शन हस्तगत केली. (Drug injections)
पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री करीत असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकातील पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना शाहुपुरी परिसरातील निंबाळकर चौक ते हॉटेल रेडियंट मार्गावरील रॉयल नेस्ट अपार्टमेंट समोर एक जण मोपेड वरुन नशिल्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात सापळा रचला पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरुन एक जण तेथे येऊन थांबला. काही वेळातच आणखी एक जण त्याच्या जवळ आला.त्यावेळी आपल्या कडील बॉक्स त्याच्याकडे दिला.त्याने तो बॉक्स मोपेडच्या डिकीत ठेवत असताना पोलिसांनी दोघांच्यावर छापा टाकून दोघांना पकडले. (Drug injections)
पकडलेल्या तेजस महाजन यांचे महाजन मेडिकल नावाचे कदमवाडी येथे महादेव मंदिरा जवळ मेडिकल स्टोअर्स आहे. त्याच्याकडे मिळून आलेल्या बॉक्स मध्ये मेफेनटर्माइन सुफ्लिफिटचीया कंपनीच्या नशिल्या इंजेक्शनच्या ७५ बाटल्या,गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मोबाईल असा एकूण एक लाख ७४ हजार १५०रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Drug injections)
या दोघां विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलिस अंमलदार वैभव पाटील,योगेश गोसावी, शिवानंद मठपती, राजू कोरे, प्रदिप पाटील, विलास किरोळकर, शुभम संकपाळ, लखन पाटील, संतोष बर्गे, विशाल खराडे, गजानन गुरव, सागर चौगुले आणि सुशील पाटील यांनी केली. (Drug injections)