कोल्हापूर; प्रतिनिधी : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानजनक विधानाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्यावतीने कोल्हापूरातील बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली. खासदार शाहू छत्रपती महाराज आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांनी शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत करत त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच २९ डिसेंबर रोजी दसरा चौक ते माणगावपर्यंत संविधान रॅली काढण्याचा निर्णय घोषित केला. (Kolhapur Congress)
बिंदू चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नेते आणि कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. यावेळी ‘जय भीम’चा नारा देण्यात आला. खासदार शाहू छत्रपती यांनी अमित शहा यांचे वक्तव्य चुकीचे आणि निषेधार्ह असल्याचे सांगून त्यांच्यावर जोरदार टीका केली.
विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी. गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अनुदगार काढून इतिहास बदलण्याचा भाजपचा प्रयत्न चालू आहे. अशा प्रकारचा कुटिल डाव देशातील जनतेला कधीच मान्य होणार नाही. महापुरुषांचा इतिहास पुसायचा आणि नवा इतिहास रचायचा हे भाजपाचे षडयंत्र सुरू आहे. (Kolhapur Congress)
आंदोलनात माजी आमदार के. पी. पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी शशांक बावचकर, शिवसेनेचे सहसंपर्कविजय देवणे, माजी नगरसेवक राजेश लाटकर, कॉम्रेड चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, उदय नारकर, अतुल दिघे, शेतकरी कामगार पक्षाचे बाबूराव कदम. डी जी भास्कर, शिवाजीराव परुळेकर, व्यंकाप्पा भोसले, प्रा टी. एस. पाटील, राजवैभव कांबळे, अनिल लवेकर, बबन रानगे, ॲड सुभाष देसाई, दिलदार मुजावर, इरशाद फरास, बाळासाहेब भोसले, साथी हसन देसाई आदींचा सहभाग होता.
हेही वाचा :