जमीर काझी : मुंबई : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशाचे गद्दार आहेत. त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केलाच पाहिजे, अन्यथा आम्ही पुन्हा जंतरमंतरवर जाऊन आंदोलन करणार, असा इशारा सीजेपी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरुवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत दिला. (Abhijit Deepak demands Dnyanesh Kumar’s resignation)
दिल्लीसारखी चूक फडणवीसांनी महाराष्ट्रात करु नये
गांधी जयंतीदिनी शिवाजी पार्कवर आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबत माहिती देताना ते म्हणाले, पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आमचे आंदोलन होणारच आहे. दिल्लीमध्ये अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर किंबहुना आंदोलकांवर लाठी चार्ज करून चूक केली. ती चूक महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी करू नये, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्यासमवेत सीजेपी स्थानिक पदाधिकारीही होते.
आता लोक घाबरत नाहीत….
दिपके म्हणाले की, शिवाजी पार्क सायलेंट झोन असल्याने मुंबई पोलीस परवानगी नाकारतली आहे. मग याच ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांची राजकीय रॅली कशी होऊ शकते ? त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का?असा सवाल करीत ते म्हणाले,’गेल्या १२ वर्षांपासून लोक घाबरले होते. मात्र, आता लोक घाबरत नाही. लोक घराघरातून आंदोलनाला येतील. परवानगी दिली असो वा नसो उद्या शिवाजी पार्कवर आम्ही आंदोलन करणारच आहोत, असेही ते म्हणाले. (Abhijit Deepak demands Dnyanesh Kumar’s resignation)
आंदोलनाला मुंबई पोलिस सहकार्य करतील
एसआयआर प्रक्रिया थांबवावी. एसआयआर यादी रद्द करावी. २०२५ च्या मतदार यादीच्या आधारेच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सीजेपीनं केली आहे. निवडणूक आयोगाची भूमिका पारदर्शक असावी, अशी आमची मागणी असल्याचं अभिजीत दिपके यांनी सांगितले.सीजेपीच्या आंदोलनाची सुरुवात उद्या मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर होत आहे. त्यानंतर गोवा, बंगळूर, पटना आणि रांची येथे आंदोलन करणार असून पुढच्या टप्प्यात दिल्लीच्या जंतर-मंतरवर आम्ही आंदोलन करणार असल्याचं यावेळी अभिजीत दिपके म्हणाले. मुंबई पोलीस हे दिल्ली पोलिसांसारखे नाही. आम्ही शांततेमध्ये आंदोलन करू. यामुळे मुंबई पोलीस आम्हाला सहकार्य करणार आहेत, असा आम्हाला विश्वास असल्याचंही दिपके यांनी म्हटलं.
ज्ञानेश कुमार गेल्यानंतर ईव्हीएम मागे…
सध्या आमच्या मुख्य मागणी ज्ञानेश कुमार यांना पदावर हटवणे, नवीन एसआयआर पद्धत रद्द करणे ही आहे, त्यानंतर आम्ही ईव्हीएम मशीन हटवण्याच्या मागे लागणार, अमेरिकेससह जगातील सर्व विकसित देशांमध्ये बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या जातात. आपल्याकडेही तसे व्हायला हवे, असेही अभिजीत दिपके यांनी सांगितले. (Abhijit Deepak demands Dnyanesh Kumar’s resignation)