जमीर काझी : मुंबई : विधिमंडळ अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या एक कोटी ८४ लाख रोख रक्कम सापडल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांवरून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची जाहीर केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदारांची अंदाज समिती १५ कोट रुपये वसूल करणार होती, असा आरोप केला आहे. (Illegal Cash found)
विश्रामगृहाच्या खोलीत बेहिशेबी रक्कम असून ही रक्कम विधिमंडळ पाहणी समितीसाठी गोळा केल्याचा आरोप करत माजी आमदार गोटे आणि शिवसेना ठाकरे गटाने खोलीबाहेर बुधवारी रात्री अचानक आंदोलन सुरू केले. धुळे विश्रामगृहातील १०२ क्रमांकाची खोली आमदारांच्या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावे १५ मे पासून बूक करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात जी विकासकामे सुरू आहेत त्या ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रक्कम गोळा करण्याचे काम सुरू होती अशी चर्चा आहे. (Illegal Cash found)
विश्रामगृहाच्या खोलीत बेहिशोबी रक्कम असून ही रक्कम विधीमंडळ पाहणी समितीसाठी गोळा केल्याचा आरोप करत माजी आमदार गोटे आणि शिवसेना ठाकरे गटाने खोलीबाहेर बुधवारी रात्री अचानक आंदोलन सुरू केले. १०२ क्रमांकाच्या खोलीत बेहिशोबी रक्कम ठेवली आहे, अशी माहिती माजी आमदार गोटे यांनी जिल्हा प्रशासनाला दिली. त्यानंतर बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास महसूल आणि पोलिसांचे पथक विश्रामगृहात पोचले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक किशोर काळे, उप विभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे, तहसीलदार वैशाली हिंगे, एलसीबी निरीक्षक श्रीराम पवार, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, बांधकाम विभागाचे अभियंता आर.आर. पाटील यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त बोलावण्यात आला. त्यानंतर खोली उघडण्यात आली. खोलीत नोटांचे घबाड बघून नोटा मोजण्याची मशिन आणण्यात आली. पहाटे पावनेतीन वाजेपर्यंत मोजणी सुरू होती. पोलिसांनी खोलीतून एक कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपये जप्त करण्यात आले. (Illegal Cash found)
दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला घेरले असून अर्जून खोतकर यांच्यावर आरोप करून ईडी, सीबीआयकडे हे प्रकरण देण्याची मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समितीचा तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला. या दौऱ्यात शासनाची जी विकास कामे झाली आहे, ती योग्य प्रकारे झाली की नाही? ते तपासण्याचे काम अंदाज समिती करत असते. परंतु, धुळे जिल्ह्यात या कामांमध्ये प्रचंड घोटाळे झाला आहे. भ्रष्टाचार झाला आहे. यामुळे अर्जून खोतकर यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर १५ कोटी जमा करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराने घेतली. गेल्या तीन दिवसांपासून ही रक्कम जमा होत होती. पाच कोटी रुपये जमा झाले होते. उर्वरित १० कोटी नंतर जमा होणार होते, असे सांगून ते म्हणाले, या प्रकरणात अर्जून खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. समिती विशेषता समितीचे अध्यक्ष किती भ्रष्ट आहे, ते समोर आले आहे. परंतु हे प्रकरण आता ईडी आणि सीबीआयकडे देण्याची गरज आहे. आपण त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. (Illegal Cash found)