नवी दिल्ली : २०२० च्या दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा आरोप असलेल्यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (२ सप्टेंबर) फेटाळला. (Delhi riots)
शरजील इमाम, उमर खालिद, अतहर खान, अब्दुल खालिद सैफी, गुल्फिशा फातिमा, मीरान हैदर, शिफा उर रहमान, मोहम्मद सलीम खान आणि शादाब अहमद यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले.
“सर्व अपील फेटाळण्यात येत आहेत,” असे न्यायमूर्ती नवीन चावला आणि न्यायमूर्ती शालिंदर कौर यांच्या खंडपीठाने निकाल देताना म्हटले. (Delhi riots)
मंगळवारी (२ सप्टेंबर) न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने सह-आरोपी तस्लीम अहमद यांच्या जामीन अर्जावरील आणखी एका आदेशानंतर हा निकाल देण्यात आला आहे. (Delhi riots)
खटल्याशिवाय पाच वर्षे कोठडीत ठेवणे हे व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे, असा युक्तिवाद आरोपींनी केला होता. या सर्वांवर बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तथापि, दिल्ली पोलिसांच्या वतीने बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी, देशाविरुद्ध कृत्य करणाऱ्यांना निर्दोष मुक्तता किंवा दोषी ठरवले जाईपर्यंत तुरुंगातच राहावे. त्यांनी अधोरेखित केले की दंगलीत एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आणि १४० हून अधिक जण जखमी झाले आणि हिंसाचार हा “सुव्यवस्थित आणि संघटित गुन्हेगारी कटाचा” परिणाम असल्याचा युक्तिवाद केला.