नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या देशांचा दौरा करून परतल्यानंतर तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्यांनी त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून काय चर्चा झाली त्याची माहिती द्यावी आणि देशाला विश्वासात घ्यावे, अशी मागणी काँग्रेसने बुधवारी (१८ जून) केली. (Congress appeals Modi)
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर श्री ट्रम्प यांच्यासोबत भोजन करणार असल्याच्या वृत्तांवर काँग्रेसने हा ‘मोठा धक्का’ असल्याचे म्हटले आहे. तसेच मोदी यांनी त्यांच्या दूरध्वनी संभाषणादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारताची नाराजी कळवायला हवी होती असे म्हटले आहे. (Congress appeals Modi)
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आणि माध्यम समन्वयक जयराम रमेश यांनी कारगिल युद्धाच्या तीन दिवसांनंतर विद्यमान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे वडील के. सुब्रह्मण्यम यांच्या अध्यक्षतेखाली कारगिल पुनरावलोकन समिती स्थापन केली होती याची आठवण सरकारला करून दिली. त्याच धर्तीवर पहलगाम पुनरावलोकन समिती स्थापन करण्याची विनंतीही केली.
‘पीटीआय’शी बोलताना श्री. रमेश म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदीसाठी व्यापार कराराची भीती घालून मध्यस्थी केल्याचा ट्रम्प यांनी दावा केला आहे. त्यांनी सातत्याने तशी विधाने केली आहे. या दाव्याचे पंतप्रधान मोदी यांनी संसदेत खंडन केले पाहिजे, अशी मागणीही रमेश यांनी केली. (Congress appeals Modi)
अमेरिकेची मध्यस्थी किंवा व्यापार कराराच्या ऑफरमुळे नव्हे तर पाकिस्तानच्या विनंतीवरून पाकिस्तानवरील ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानचे हल्ले थांबवले होते, असे मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलताना सांगितल्याचे वृत्त आल्यानंतर रमेश यांनी ही मागणी केली आहे.
मंगळवारी (१७ जून) ट्रम्प यांच्याशी झालेल्या ३५ मिनिटांच्या फोन कॉलमध्ये, मोदी यांनी त्यांना पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांविरुद्ध भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली आणि स्पष्ट केले की त्यांनी कधीही कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारली नाही आणि भविष्यातही ती कधीही स्वीकारणार नाही, असे सांगितल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले. (Congress appeals Modi)
भारतासाठी तिहेरी धक्का
ट्रम्प जनरल मुनीर यांच्यासोबत भोजन करणार असल्याच्या वृत्तावर रमेश म्हणाले, ‘‘भारतीय राजनैतिकतेसाठी हा तिहेरी धक्का आहे. सरकारचे प्रमुख नसलेल्या लष्करी माणसाला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत एका खास वैयक्तिक जेवणासाठी आमंत्रित केले जात आहे. हा एक मोठा धक्का आहे. दुसरा मोठा धक्का तेव्हा आला जेव्हा अमेरिकेचे सेंट्रल कमांड चीफ जनरल मायकेल कुरिल्ला यांनी पाकिस्तानला दहशतवादविरोधी कारवायांमध्ये ‘असामान्य भागीदार’ घोषित केले होते. याच पाकिस्तानने २ मे २०११ रोजी अबोटाबादमध्ये मारल्या गेलेल्या ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता. हा पाकिस्तान एक असाधारण भागीदार कसा बनतो? पाकिस्तान एक असाधारण गुन्हेगार आहे. गुन्हेगाराला भागीदार म्हणणे भारतीय राजनैतिकतेसाठी एक धक्का आहे,’ असे रमेश यांनी पीटीआयला सांगितले. ते म्हणाले की, आणखी एका धक्का म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचे आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करण्याचे श्रेय १४ वेळा घेतले.
हेही वाचा :
ट्रम्प यांच्या ‘मध्यस्ती’चे दावे मोदींनी फेटाळले
केवळ तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास