जळगाव : प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात ऑनर ऑनर किलिंगच्या घटनेनं महाराष्ट्र हादरुन गेला आहे. एका निवृत्त पोलिस उप निरीक्षकाने लग्नात घुसून आपल्या मुलीवर गोळीबार केला. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. तर जावई जखमी झाला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा या ठिकाणी घडली. गोळीबाराच्या घटनेनंतर लग्नात आलेल्या वऱ्हाडींनी गोळीबार करणाऱ्या बापावर हल्ला करत त्यालाही गंभीर जखमी केलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे. (Honor killing)
प्रेम विवाह केल्याच्या रागातून सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर एका लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. (Honor killing)
मिळालेल्या माहितीनुसार, साधारण दोन वर्षभरापूर्वी तृप्ती मांगले हिने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात रहात होते. अविनाशच्या नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी दोघेही शनिवारी चोपडा शहरात आले होते. याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत तृप्ती आणि अविनाशवर गोळ्या झाडल्या. किरण मांगले यांनी रिव्हाल्व्हरमधून तीन गोळ्या फायर केल्या. एका गोळीत तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश यांच्या हातात व पाठीत गोळी घुसली असून गंभीर जखमी झाला आहेत. जखमी अविनाशला हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले आहे. चोपडा येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (Honor killing)
हेही वाचा :