नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणूकीची घोषणा केली. विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. सहा आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. भाजप एनडीए विरुध्द इंडिया आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रिया अवघ्या एका महिन्यात पूर्ण करावयाची असल्याने सर्व राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. बिहारमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम राबवून मतदार यादी अद्यायावत केली असल्याने या विषयावर विरोधी पक्षांनी रान उठवले होते. बिहारची जनता नितिशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएकडे सत्ता देणार की राजद, काँग्रेस आघाडीच्या Bihar (Assembly elections announced)
निवडणूक अधिसूचना १० ऑक्टोबरला
नवी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणूकीची घोषणा केली. बिहारसोबत सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात १२१ विधानसभा मतदारसंघात तर ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात १२२ विधानसभा मतदारसंघात निवडणूका होणार आहे. निवडणूकीची अधिसूचना १० ऑक्टोबर रोजी जारी करण्यात येणरार असून १७ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. १८ ऑक्टोबर उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत २० ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. (Assembly elections announced)
मतमोजणी १४ नोव्हेंबरला
दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या निवडणूकीसाठी १३ ऑक्टोबरला अधिसूचना जारी होणार आहे. २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असेल. २१ ऑक्टोबरला छाननी तर २३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ११ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होईल. २४३ जागांसाठी मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
बिहारमध्ये ७ कोटी ४३ लाख मतदार
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये ७ कोटी ४३ लाख मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या ३ कोटी ९२ लाख तर महिला मतदारांच् संख्या ३ कोटी ५० लाख इतकी आहे. १७२५ तृतीयपंथीय मतदार आहेत. ७.२ लाख दिव्यांग मतदार आहेत. तर ८५ पेक्षा जास्त वय असलेले ४.४ लाख मतदार बिहारमध्ये आहेत. २० ते २९ वयोगटातील एक कोटी ६३ लाख मतदार आहेत. १४.१ लाख मतदार १८ ते १९ वयोगटातील असून हे मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.
२०२० च्या निवडणूकीत आरजेडी सर्वात मोठा पक्ष
२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत आरजेडीने ७५ जागांवर विजय मिळवला होता. त्यांच्या मतांची टक्केवारी २३.५ एवढी होती. भाजपला ७४ जागा मिळाल्या त्यांच्या मतांची टक्केवारी १९.८ टक्के होती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलाला (यू) १५.७ टक्के मतदान झाले होते. या पक्षाला ४३ जागा मिळाल्या होत्या. जेडीयू तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. मात्र सरकार जेडीयूचे नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वात तयार झाले.
एनडीए विरुद्ध् राजद काँग्रेस आघाडी
भाजप नेतृत्त्वातील एनडीएमध्ये जेडीयूसह विकसशील इंसान पार्टी, (व्हीआयपी), हिंदुस्तान आवाम मोर्चा यांचाही सहभाग आहे. तर महागठबंधनमध्ये काँग्रेस, आरजेडी, सीपीआय (एमएल), सीपीआय आणि सीपीआय (एम) यांचा समावेश आहे. तर हैदराबादमधील एआयएमआयएम देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. केंद्रातील एनडीएचा घटक पक्ष लोक जनशक्ती पार्टी देखील बिहारमधील महत्त्वाचा पक्ष आहे. त्यासोबतच बहुजन समाज पार्टी आणि पप्पू यादव यांच्या नेतृत्त्वातील जन अधिकार पार्टी देखील निवडणुकीच्या रिंगणात राहाणार आहे. (Assembly elections announced)