नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. त्यांची प्रतिमा निव्वळ मीडियाने मोठी केली आहे, प्रत्यक्षात निव्वळ दिखावा आहे, अशी टीका त्यांनी केली. (Rahul jabs on Modi)
शुक्रवारी (२५ जुलै) नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ओबीसींच्या ‘भागीदारी न्याय संमेलना’त ते बोलत होते.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेवरून लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात, ‘मेक इन इंडिया’सह अनेक योजनांच्या अपयशांवर प्रकाश टाकताना त्यांनी, पंतप्रधान मोदी आर्थिक आव्हानांवर खऱ्या उपाययोजना करण्यापेक्षा निव्वळ ‘आकर्षक घोषणाबाजी’ करतात, असे म्हटले होते.(Rahul jabs on Modi)
श्री. गांधी पुढे म्हणाले की, मी २१ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एक महत्त्वाची चूक केली आहे. ती म्हणजे इतर मागासवर्गीय (ओबीसी) वर्गाच्या हिताचे रक्षण करता आले नाही. तेलंगणातील जातीय जनगणना हा एक राजकीय भूकंप आहे जो देशात भविष्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.(Rahul jabs on Modi)
भूसंपादन विधेयक, मनरेगा, अन्न सुरक्षा विधेयक, आदिवासींसाठी लढा, या चांगल्या गोष्टी माझ्या हातून झाल्या, असे ते म्हणाले. ‘‘दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक, महिलांच्या विकासाच्या मुद्द्यांवर मला वाटते मी चांगले काम केले. पण जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला स्पष्टपणे दिसून येते की माझ्यात एका गोष्टीची कमतरता होती, ती एक चूक केली. ती म्हणजे ओबीसी वर्गाचे जसे रक्षण करायला हवे होते तसे केले नाही. पण यापुढे मी या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.