महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर बॅडमिंटन क्रीडा प्रकारात देशाचे नाव मोठे करणारी भारताची फुलराणी पी.व्ही. सिंधू विवाह बंधनात अडकणार आहे. पी.व्ही. सिंधू २२ डिसेंबरला उदयपूर येथे पोसीइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक वेंकट दत्ता साई यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहे.
पी.व्ही. सिंधू आणि वेंकट दत्ता साई यांच्या लग्नसोहळ्याला २० डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. तर, २२ डिसेंबरला उदयपूरमध्ये विवाह सोहळा होणार आहे. यानंतर, २४ डिसेंबरला हैदराबाद येथे स्वागत समारंभाचे आयोजक करण्यात आले आहे. पी.व्ही. सिंधू आणि वेंकट दत्ता साई यांची कुंटुंबे एकमेकांना ओळखत होती. परंतु, काही दिवसांपूर्वी लग्नाविषयी सर्वकाही ठरवण्यात आले होते.
नव्या वर्षाच्या सुरूवातीपासून पी.व्ही. सिंधू विविध स्पर्धांमुळे व्यस्त राहणार आहे. यामुळे डिंसेंबरमध्येच लग्नाचे आयोजन होणार होते. असे सिंधूचे वडिल पी.व्ही रामणा यांनी पीटीआय दिलेला सांगितले.
कोण आहेत सिंधूचे पती?
वेंकट दत्ता साई हे पोसीडेक्स टेक्नॉलॉजीजमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करतात. त्यांचे वडील जी.टी. व्यंकटेश्वर राव हे या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक पदावर आहेत. त्यांनी यापूर्वी भारतीय महसूल सेवा विभागात काम केले आहे. साई यांनी फाऊंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एड्युकेशनमधून लिबरल आर्ट्स अँड सायन्समध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे. २०१८ मध्ये त्यांनी फ्लेम युनिव्हर्सिटीतून BBA पूर्ण केलं आहे.