नवी दिल्ली : पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली. त्यात पाकिस्तानबरोबर असलेला सिंधू करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला. तसेच अटारी चेक पोस्ट बंद करण्यासह पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.(India’s major decisions)
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ही कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक पार पडली. या बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले. भारताने हल्लेखोरांना पाकिस्तानचा असलेला थेट पाठिंब्यावरून निर्णयाचा जोरदार प्रहार केला. भारताने पाकिस्तानवर थेट आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी दूतावास बंद करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. (India’s major decisions)
बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएसए अजित डोभाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सरकारने गुरुवारी (२४ एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. बुधवारी श्रीनगर आणि दिल्लीत अनेक बैठका पार पडल्या.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. त्यानुसार,
- पाकिस्तानसोबतचा १९६० चा सिंधू पाणी करार तत्काळ स्थगित करण्यात आला. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्याचे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित केला आहे. (India’s major decisions)
- अटारी चेक पोस्ट तत्काळ बंद करण्याचा निर्णय झाला. ज्यांनी वैध परवानगी घेऊन या मार्गाने सीमा ओलांडली आहे ते १ मे २०२५ पूर्वी त्याच मार्गाने परत येऊ शकतात.
- सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी नाही. पूर्वी जारी केलेले सर्व एसव्हीईएस व्हिसा अवैध मानणार. सध्या व्हिसावर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश. (India’s major decisions)
- नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई दल सल्लागार ‘पर्सोना नॉन ग्राटा’ (नको असलेली व्यक्ती) घोषित. त्यांना भारत सोडण्यासाठी ७ दिवसांची मुदत.
- भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून आपले संरक्षण, नौदल आणि हवाई दल सल्लागार मागे. संबंधित उच्चायुक्तालयांमध्ये ही पदे रद्द.
हेही वाचा :
दहशतवाद, धर्म आणि राजकारण
आठवड्यापूर्वीच लग्न आणि…