मुंबई : प्रतिनिधी : जागतिक क्रिकेटचा उद्धार करण्याची जबाबदारी नियतीने भारतावर सोपवली आहे. जय शहा यांनी शंभर सेंच्युरी मारल्या, गावस्कर, सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवले. ज्याने शे दिडशे विकेट्स घेतल्या, ज्याने शंभर-दोनशे कॅचेस पकडल्या, असे महान जय शहा भारतीय क्रिकेटचे सूत्रधार आहेत, अशी घणघाती टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.(Raut criticized Shah)
ते दुबईला इस्लामी राष्ट्रात बसतात भारतात नाही. पाकिस्तानचे क्रिकेटपटू मोसी नकवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री हातात हात घालून काम करणार. इथे दुसरे कोणी असते तर हिंदुत्व, राष्ट्रवाद धोक्यात आला असता. भारतीय जनता पक्षाने छाती बडवली असती. या मंत्र्यांच्या जागी कोणी शिवसेनेचा किंवा काँग्रेसचा असता तर अक्षरशः गोंधळ घातला असता. पण आता भारताच्या क्रिकेटच्या उद्धारासाठी महाराष्ट्रातले भाजपचे एक मंत्री पाकिस्तानचे क्रिकेटपटू, त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष झाले, त्यांच्या हाताखाली काम करणार आणि अशा तऱ्हेने पाकिस्तान आणि महाराष्ट्राचे मंत्री भाजपचे ते हातात हात घालून गुण्या गोविंदाने नांदणार, या शब्दांत राऊत यांनी भाजपच्या राजकारणाचा समाचार घेतला. (Raut criticized Shah)
मशिदी झाकून ठेवा, मटणांची दुकाने वेगळी करा
लोकांनी इथे मारामाऱ्या करायच्या, मशिदी झाकून ठेवायच्या, मुसलमानांची मटणांची वेगळी दुकानं करायला लावावायची. लोकांना मूर्ख बनवायचे धंदे जरा बंद करा. दुसरे कोणी असते तर राजीनामा द्यायला लावला असता. महाराष्ट्रातून किवा देशातून दुसरा कोणी एखादा सदस्य त्या मोहसीन नकवीच्या हाताखाली काम करणारा असता तर त्यांनी राजीनामा द्यायला लावला असता, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
शेलारांचा शहांच्या हस्ते सत्कार केला पाहिजे
बाळासाहेबांनी जावेद मियादला बोलावलं नव्हते तुम्ही अभ्यास करून बोला, असे स्पष्ट करून राऊत म्हणाले, जावेद मियाँदाद दिलीप वेंगसरकर यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आला होता. जावेद मियाँदाद दिलीप वेंगसरकर बरोबर आहे याची मातोश्रीला कल्पना नव्हती. भारतीय क्रिकेटचे कर्णधार वेंगसरकर त्यांना वेळ दिली त्यांच्याबरोबर जावेद मियाँदाद होते. जावेद मियादाँद तिथे आल्यावर बाळासाहेबांनी पाहुणचार केला आणि जाताना सुनावलेही. आज पाकिस्तानच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसण्याचे शौर्य आणि प्रखर राष्ट्रवाद महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाने दाखवल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंनी आशिष शेलार यांचा वीर सावरकर सभागृहात, संघाच्या मुख्यालयात जय शहांच्या हस्ते सत्कार केला पाहिजे, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला. (Raut criticized Shah)
ट्रम्प धू धू धुतोय, विष्णूचे अवतार गप्प आहेत…
यांना फक्त चमचेगिरी आणि बूट चाटेगिरी कळते, अशी टीका करून राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार आहेत का? ट्रम्प तिथे भारताला धू धू धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. अख्खे जग ट्रम्पविरोधात आहे. फक्त एकच देश तोंडात बोळा घालून बसलाय तो म्हणजे आपला भारत. देशाचे पंतप्रधान देव आहेत ना, विष्णूचे अवतार? मग सुदर्शन चक्र सोडले पाहिजे या देवाने ट्रम्प वर, असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला.
हेही वाचा :
‘फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने घेतलेले आक्षेप कितपत योग्य?
कॉर्पोरेट पीक विमा कंपन्या : “आओ जाओ घर तुम्हारा” ?