जमीर काझी : मुंबई : भोंदू अशोक खरात याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकारण्याशी फोनचे कॉल डिटेल्स (सीडीआर ) जाहीर करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यावरून यावरून आता वातावरण तापले असून, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दमानिया यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. असे कोणतं ॲप आहे ज्यात नंबर टाकला की सीडीआरची माहिती मिळते?, असा सवाल उपस्थित करीत अंधारेंनी दमानियांना कोंडीत पकडले आहे. (Andhare launches a scathing attack on Damania over the ‘CDR’ case)
अशोक खरात प्रकरणावर बोलताना दमानिया यांनी शनिवारी मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यामध्ये १७ वेळा फोन कॉल्स झाले होते. एआयवरून माहिती घेतली असल्याचे अजब उत्तर दिले आहे.
अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्यावर ट्विट करत ‘तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरुद्ध बोलल्याने फायदा नुकसान किंवा चर्चा होते अशा कुठल्याही भ्रमात राहू नका. गतकाळातल्या एका स्वयंघोषित समाजसुधारकाची तुम्ही सुधारित आवृत्ती आहात हे एव्हाना सगळ्यांना कळलेलेच आहे. असे सांगून त्या म्हणाल्या, ‘मी तुम्हाला अगदी मुद्द्याचे प्रश्न विचारलेले आहेत. रूपाली चाकणकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झालीच पाहिजे. या प्रकरणाशी संबंधित कोणीही असो त्या कुणाचीही गय केली जाऊ नये हीच भूमिका आहे. पण हे सगळं बोलताना, तुम्ही मूळ प्रश्नाला बगल दिली तुम्हाला सीडीआर दिले कुणी? असा कोणता ॲप आहे ज्यामध्ये नंबर टाकल्यावर इनकमिंग आउटगोइंग कॉल ड्यूरेशन या सगळ्या गोष्टी मिळतात? तो कोण माणूस आहे ज्याच्या म्हणण्यावर तुम्ही इतका विश्वास टाकला या प्रश्नांना बगल का देताय ? बरोबर भाजपाचे प्रकरण आल्यावर तुमचे मित्र नातेसंबंध त्यांचे सुखदुःखाचे कार्यक्रम या सगळ्या गोष्टीत तुम्ही कशा काय व्यस्त होता? आणि एरवी मात्र तुम्ही दुबई अमेरिकेत आसाममध्ये कुठेही असाल तिथून अचानक प्रकट होता.. ?’ असं ट्विट करत अंधारे यांनी दमानिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरुद्ध बोलल्याने फायदा नुकसान किंवा चर्चा होते अशा कुठल्याही भ्रमात राहू नका. गतकाळातल्या एका स्वयंघोषित समाजसुधारकाची तुम्ही सुधारित आवृत्ती आहात हे एव्हाना सगळ्यांना कळलेलेच आहे.असा टोला लगावला आहे. (Andhare launches a scathing attack on Damania over the ‘CDR’ case)
सीडीआर फुटीबद्दल चौकशी होणार
नाशिकमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सीडीआरवर प्रतिक्रिया दिली आहे. अशा पद्धतीने सीडीआर प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो अधिकार फक्त तपास यंत्रणांना आहे, त्यामुळे हा सीडीआर लीक कसा झाला? याची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
अंजली दमानियांचे स्पष्टीकरण
अंजली दमानियांना सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सीडीआर कसा मिळाला याचे स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, एक तारखेला बारा वाजता एका व्यक्तीचा मला खरातांची माहिती द्यायची आहे, असा मेसेज आला. त्याच कॉल घेता असता त्याने खरातचा माझ्याकडे सीडीआर आहे असे सांगितले. दुसऱ्या एका नंबरवरुन मला सीडीआरची एक्सेल शीट पाठवली. ही व्यक्ती प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होती. त्या व्यक्तीच्या डिटेक्टिव्ह कंपनीची माहिती घेतली असता ती योग्य होती. एक्सेल शीटवरील माहिती मी क्लाऊड अप वर टाकली. त्यामधून मला फोन नंबर कोणाचे आहेत हे कळाले. ही माहिती मी डीजी दाते यांना आणि यंत्रणाही पाठवले आहे. (Andhare launches a scathing attack on Damania over the ‘CDR’ case)