नवी दिल्ली : बेदरकार आणि बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास विमा कंपन्या जबाबदार नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. (Accidental claim)
भरधाव आणि बेदरकापणे गाडी चालवताना मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीच्या पत्नी, मुलगा आणि पालकांनी मागितलेली ₹८० लाखाची भरपाई देण्यास न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने नकार दिला.(Accidental claim)
कर्नाटक उच्च न्यायालयाने २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मृतांच्या कायदेशीर वारसांनी भरपाईचा दावा करण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाच्या या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
‘‘आम्ही उच्च न्यायालयाने दिलेल्या वादग्रस्त निकालात हस्तक्षेप करण्यास तयार नाही. म्हणून, विशेष रजा याचिका फेटाळण्यात येत आहे,’’ असे खंडपीठाने बुधवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.(Accidental claim)
१८ जून २०१४ रोजी, एन.एस. रविशा मल्लासंद्रा गावाहून अरसिकेरे शहराकडे गाडीतून येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. त्याचे वडील, बहीण आणि तिची मुले या कारमधून प्रवास करत होते.
न्यायालयाला असे आढळून आले की, रविशाने वाहतूक नियमांचे पालन न करता निष्काळजीपणे गाडी चालवली. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या अपघातात रविशा गंभीर जखमी झाला.(Accidental claim)
उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते, ‘‘हा अपघात मृत व्यक्तीच्या बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवण्यामुळे झाला आणि तो स्वतःवर संकट ओढवून घेणारा आहे. त्यामुळे त्याचे कायदेशीर वारस त्याच्या मृत्यूसाठी कोणत्याही भरपाईचा दावा करू शकत नाहीत, अन्यथा तो नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या चुकांसाठी भरपाई मिळण्यासारखा असेल.’’
हेही वाचा :
फोन टॅपिंगचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा आदेश कोर्टाकडून रद्द
‘मुख्यमंत्री थप्पड’ घटनेतील पोलिस अधिकाऱ्याकडून व्हीआरएसची मागणी