नवी दिल्ली : प्रतिनिधी : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आज, बुधवारी (९ एप्रिल) रात्री किंवा गुरुवारी पहाटे भारतात आणण्याची शक्यता आहे. भारतात आणल्यानंतर त्याला एनआयएच्या ताब्यात देण्याची शक्यता आहे. राणाला दिल्लीतील तिहार जेलमध्ये किंवा मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. (Tahawwur Rana)
तहव्वूर राणा सध्या अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथील कारागृहात आहे. तहव्वूर राणाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. त्याला भारतात आणण्यासाठी गेले महिनाभर हालचाली सुरू आहेत. भारत दीर्घकाळ तहव्वूर राणाला भारतात परत द्या, अशी मागणी करत आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ट्रम्प यांच्यासमवेत झालेल्या भेटीत अमेरिकेने भारताची मागणी मान्य केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांचे पथक राणाला भारतात घेऊन येणार आहेत. (Tahawwur Rana)
२६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड
२००८ मध्ये झालेल्या हल्ल्यात १६६ लोकांचे जीव गेले होते. या हल्ल्यातील दहशतवादी कसाब याला जिवंत पकडले होते. आणखी काही दहशतवादी चकमकीत ठार झाले होते. कसाबवर खटला दाखल करुन त्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती. ती अंमलातही आणली गेली. या खटल्यातील प्रमख आरोपी तहव्वूर राणा होता. तो अमेरिकेच्या ताब्यात आहे. अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी दर्शवली असल्याने त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Tahawwur Rana)
आयएसआय, लष्कर ए तोयबाचा सदस्य
तहव्वूर राणा आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. राणा आणि त्याचा खास मित्र डेव्हिड हेडलीने हल्ल्याचा कट रचून प्रत्यक्षात अंमलात आणला होता. अमेरिकन तपास यंत्रणेसमोर हेडलीने राणाचे नाव घेतले होते. हल्ला करण्यापूर्वी हेडली भारतात आला हाता. त्याने मुंबईतील ताज हॉटेल, लियोपोल्ड कॅफेसह अन्य जागांची रेकी केली होती. त्यानंतर आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षित केलेले लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. (Tahawwur Rana)
हेही वाचा :