मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना शिंदे गटातील २० ते २५ आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियंत्रणाखाली आहेत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.(Sanjay Raut)
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले, राज्यात सरकार बहुमताने आले तरी या सरकारमध्ये एकसंघपणा किंवा एकवाक्यता नाही. एकमेकांविरोधात कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर संपली आहे. शिंदे आणि त्यांचा गट सरपटणारा प्राणी झाला आहे, अशी टीकाही राऊत यांनी केले.(Sanjay Raut)
एकनाथ शिंदे खासगीत सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदी मीच राहणार असे वचन मिळाल्यामुळे आम्ही फुटलो, पण निवडणुका झाल्यानंतर शिंदे यांना खड्यासारखे बाजूला केले, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले. शिंदे यांना उपमुख्यमंपत्रिपद, काहींना मंत्रिपदे दिली. पण सध्या एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहिला की असे लक्षात येते की ते अजूनही शून्यात आणि गुंगीत आहेत. या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. आपल्याला ५० ते ५५ जागा कशा मिळाल्या हा पहिला धक्का त्यांना बसला. भाजपने दिलेला शब्द पाळला नाही हा दुसरा धक्का मिळाला. त्यातून ते कोलमडलेले आहेत.(Sanjay Raut)
शिंदे गटातील २० ते २५ आमदारांच्या गटावर फडणवीस यांचे पूर्ण नियंत्रण आहे असा दावा संजय राऊत यांनी केला. हे लोक फडणवीस आणि अमित शहा यांच्या सांगण्यावरुन सुरतला गेले. ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी गेले नाहीत. आजही त्यांच्यावर फडणवीस यांचेच नियंत्रण आहे. जे उरलले आमदार आहेत ते चलबिचल आणि चंचल आहेत. त्यांना आपली कोंडी होत आहे, असे वाटते. भविष्यात आपल्याला जे नेतृत्व संरक्षण देईल त्यासाठी आपण पुन्हा मागे फिरायचे का? अशी त्यांची भावना झाली आहे, अशी माझी माहिती आहे असेही खासदार राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर का रहायला गेले नाहीत?
फडणवीस अद्याप मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या अधिकृत बंगल्यावर का रहायला गेले नाहीत, असा सवाल करून काळी जादू असल्याने मुख्यमंत्री अजूनही अधिकृत निवासस्थानी जात नाहीत याचे उत्तर काळी जादूवाल्यांनी द्यावे, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा:
भारत पुन्हा ‘वर्ल्ड ग्रुप-१’मध्ये
भारत दुसऱ्यांदा जगज्जेता
अर्थव्यवस्थेला गती मिळेल