डेहराडून : केदारनाथ परिसरात शनिवारी (१७ मे) सकाळी एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश झाली. दुपारी बाराच्या सुमारास केदारनाथ हेलिपॅडजवळ लँडिंग करताना ही दुर्घटना घडली. पायलट, डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ हे तिघेही सुरक्षित आहेत. (air ambulance crash)
एअर अॅम्ब्युलन्सची मागची बाजू जोरात आदळल्याने हा अपघात झाला.
केदारनाथसाठी हेलिपॅड सेवांचे प्रभारी असलेले जिल्हा पर्यटन अधिकारी राहुल चौबे यांच्या मते, “एका रुग्णाला श्वसनाचा त्रास होत होता. त्यानंतर आम्ही हेलिपॅड मदतीसाठी एम्स ऋषिकेशशी संपर्क साधला. काही तांत्रिक अडचणींमुळे हेलिपॅड पायलट केदारनाथ हेलिपॅडवर उतरू शकला नाही. त्यानंतर पायलटने जवळच्या मोकळ्या मैदानात उतरण्याचा प्रयत्न केला.” (air ambulance crash)
त्यांनी सांगितले की, “लँडिंग करताना हेलिकॉप्टरचा मागील भाग क्रॅश झाला आणि शेपूट तुटली.” चौबे यांनी या दुर्घटनेत कोणत्याही मृत्यूची नोंद झाली नसल्याचे स्पष्ट केले. “डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करेल,” असे ते म्हणाले.