नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने हटविणे गरजेचे आहे, ज्यामुळे लाल कांद्याचे दर टिकून राहतील आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना… pic.twitter.com/YISUKcW4z5
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 19, 2024
अजित पवार
नाशिक : मी कुणाच्या हातचे बाहुले नाही. कुणाच्याही सांगण्याने माघार घेईल, असा भुजबळ नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आपली भविष्यातील भूमिका आय असणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी किशोरकुमार यांनी गायिलेल्या गाण्यातील “ जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना,” या ओळी उधृत केल्या. त्यामुळे भुजबळांच्या मनात नक्की काय सुरू आहे, यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. (Chhagan Bhujbal)
नव्या मंत्रिमंडळात भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आले आहे. त्यामुळे ते नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांनी राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख अजित पवार यांच्यावर मंगळवारी टीका केली. माझ्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहे. तरीही आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे भुजबळ यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी भुजबळ नागपूरहून नाशिकला आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविरोधात मी भूमिका घेतली. मी ओबीसी समाजाच्या बाजूने राहिल्यामुळे माझा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. माझ्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होती. पण मला वगळण्यात आले. ते कुणाच्या सांगण्यावरून नाकारले याचा शोध आता मला घ्यावा लागेल, असे भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal)
एक गोष्ट नक्की आहे की प्रत्येक पक्षाचे प्रमुख याबाबत निर्णय घेतात. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस, शिवसेनेत एकनाथ शिंदे निर्णय घेतात. तसे साहजिकच आमच्या गटाचा निर्णय अजित पवार घेतात, असे सांगत भुजबळ यांनी अजित पवारांकडे अंगुलीनिर्देश केला.
बुधवारी नाशिकमध्ये दिशा ठरणार
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भुजबळ विजयी झाले आहेत. राज्यभरातील समर्थक बुधवारी नाशिकमध्ये जमणार असून सर्वांशी चर्चा करून ते पुढील वाटचाल ठरवतील, असा इशारा देत भुजबळ यांनी शक्तिप्रदर्शनासह दबावतंत्र अवलंबण्याचे संकेत दिले. मंत्रिपद न मिळाल्याचे मला दु:ख नाही. पण पक्षाकडून सातत्याने अवहेलना होते, याचा त्रास होतो, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘त्यांनी (अजित पवार) मला लोकसभा लढवण्यास सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही तसे सांगितले. मी सर्व तयारी पूर्ण केली पण महिना उलटला तरी त्यांनी माझे नाव घोषित केले नाही. त्यामुळे मीच लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला. मला राज्यसभेवर जायचे होते, तेव्हा विधानसभेची निवडणूक लढवावी, असे सांगण्यात आले. मला आठ दिवसांपूर्वी राज्यसभेची ऑफर आली होती, ती मी नाकारली. एकदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी राज्यसभा कशी स्वीकारू? मी राजीनामा कसा देऊ शकतो? हा माझ्या मतदारांचा विश्वासघात नाही का? मी एक-दोन वर्षांनी राज्यसभेवर जाईन, पण आता नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. (Chhagan Bhujbal)
“आम्ही भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दर्शवली आहे,” या प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर “मला त्यांना विचारायचे आहे की, मी तुमच्या हातातील बाहुले आहे का? तुम्ही मला वाटेल तेव्हा राज्यसभेवर जायला ण्यास सांगता, तुम्हाला वाटेल तेव्हा बसायला सांगा, वाटेल तेव्हा उभे राहायला सांगा,” असा संताप भुजबळ यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
-विजय चोरमारे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नाराजीचा महापूर आला आहे. मंत्रिमंडळात कोण समाविष्ट झाले आणि कोण राहिले, त्याची कारणे काय याच्या चर्चा झडू लागल्या आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांबरोबर विरोधकांनाही आश्चर्य वाटत आहे. भुजबळ यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील दीर्घकालीन प्रभाव हे त्याचे कारण आहे. त्यांचे योगदान आणि प्रभाव ओळखणारे समर्थक आणि विरोधक हे मान्य करतात की भुजबळ हे राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेते आहेत. (Chhagan Bhujbal)
भुजबळ यांची राजकीय कारकीर्द
छगन भुजबळ यांनी १९७३मध्ये मुंबई महानगरपालिकेचे सदस्य म्हणून आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात त्यांची प्रभावी घोडदौड सुरू झाली. पुढे काँग्रेसचे आणि नंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) ते महत्त्वाचे नेते बनले. शरद पवार यांची राजकीय कारकीर्द १९६७ साली सुरू झाली, परंतु ती थेट विधानसभेपासून सुरू झाली. भुजबळांची कारकीर्द त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे १९७३ मध्ये सुरू झाली, परंतु ती महापालिकेपासून. त्यांना विधानसभेत पोहोचायला १९८५ साल उजाडले. त्याअर्थाने विचार केला तर शरद पवार यांच्यानंतर इतकी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असलेला छगन भुजबळ यांच्याशिवाय दुसरा नेता सापडत नाही. नेते सापडतील, परंतु राजकारणात सलग सक्रीय असलेला नेता आढळणार नाही. पन्नास वर्षांहून अधिक राजकीय कारकीर्द असलेल्या भुजबळ यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव राहिला. त्यांचा आवाकाही मोठा होता. परंतु त्यांची पावले चुकीची पडत गेली आणि त्यांनी राज्याचे नेते होण्याची संधी गमावली.
ओबीसी (इतर मागासवर्गीय) समुदायासाठीची त्यांची बांधिलकी हा त्यातला महत्त्वाचा दुवा होता. आपल्या ओबीसी समर्थनाच्या ताकदीचा उपयोग त्यांनी राजकारणातील आपले वजन वाढवण्यासाठी केलाच. शिवाय आपले उपद्रवमूल्य दाखवण्यासाठीही केला. (Chhagan Bhujbal)
संघर्ष आणि राजकीय डावपेच
शरद पवार यांच्याशी भुजबळ यांचे संबंध नेहमीच गुंतागुंतीचे राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर अजित पवार भाजपसोबत गेले, तेव्हा भुजबळ यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. यामुळे शरद पवार यांच्याशी त्यांचे संबंध अधिक ताणले गेले. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आमदार जमलेले असताना, भुजबळ यांनी शरद पवारांना त्याची कल्पना दिली. तिकडे काय चाललंय पाहून तुम्हाला सांगतो, असं म्हणून गेलेल्या भुजबळ यांनी थेट मंत्री म्हणून शपथच घेतली.
फाटाफुटीनंतर भुजबळ यांनी घेतलेली भूमिका विशेष लक्षवेधी आणि वादग्रस्तही ठरली. ओबीसी चळवळीचे नेते ही आपली ओळख अधिक ठळक करण्यासाठी ते मंत्री असताना आंदोलनात उतरले. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या विरोधात उभे राहिले. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर सातत्याने टीका करीत राहिले. त्यामुळे दोन्ही समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. मराठा आरक्षणाच्या आंदोलन काळात भुजबळ यांची राजकीय भूमिका अधिक चर्चेत राहिली. कारण मंत्री असताना त्यांनी आदोलनाविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे सरकारलाही टीकेचा आणि अडचणीचा सामना करावा लागला. मराठा आरक्षणाला समर्थन दिल्याचे ते वारंवार जाहीर करतात, परंतु त्यांना ओबीसी प्रवर्गात सामावण्याला भुजबळ यांचा तीव्र विरोध आहे. भुजबळ यांनी या मुद्द्यावर सभा, मोर्चे आणि चर्चा आयोजित करून ओबीसी हक्कांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे ते ओबीसी समुदायाचे प्रमुख नेते म्हणून चर्चेत राहिले. (Chhagan Bhujbal)
गर्दी खेचणारे वक्ते
भुजबळ यांच्या कारकिर्दीत अनेक अडचणी आल्या. ज्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांचा आणि विविध वादांचा समावेश आहे. महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार तसेच बेहिशेबी संपत्ती जमवल्याच्या कारणावरून त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. ते अडीच वर्षे तुरुंगात राहिले. मात्र तरीही तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी आपले राजकीय अस्तित्वाल टिकवून ठेवले.
भुजबळ हे गर्दी खेचणारे आणि गर्दीला खिळवून ठेवणारे वक्ते आहेत. हजारोंच्या समुदायाला ते आपल्या नाट्यपूर्ण आणि खटकेबाज भाषणांनी मंत्रमुग्ध करू शकतात. याच ताकदीने त्यांना राज्याच्या नेतृत्वापर्यंत नेले. परंतु आपले उपद्रवमूल्य दाखवण्याच्या हौसेपाई त्यांनी ओबीसी चळवळीचा आधार घेतला. त्यासाठी मराठा समाजाचा रोष पत्करला. ओबीसी आंदोलनातही पुढे पुढे ते फक्त माळी समाजाचे नेते म्हणून उरले. नंतरच्या टप्प्यात माळी समाजातील नेत्यांनीही त्यांना आव्हान दिले. राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले भुजबळ जातीपातीचे राजकारण करण्याच्या प्रयत्नात आपला राजकीय अवकाश संकुचित बनवत गेले. ज्या भुजबळांनी मंत्रिमंडळ ठरवायचे, त्या भुजबळांवर मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची नामुष्की आली, त्याचे हेच मुख्य कारण आहे.
अनेक चढउतारांची कारकीर्द
सध्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भुजबळ यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची भूमिका कितपत महत्त्वाची राहील? आजवर अनेक चढउतार त्यांच्या राजकीय प्रवासात आले. वेळोवेळी ते फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेऊन वर आले. आता त्यांना साधे आमदार ठेवल्यामुळे त्यांचा प्रभाव राहील का, हा खरा प्रश्न आहे. भुजबळ यांच्यासमोर सध्या मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यावर ते मात करतात किंवा कसे, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. (Chhagan Bhujbal)
अनिश्चित भवितव्याचा मार्ग
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सतत बदलत असताना छगन भुजबळ यांची भूमिका उत्सुकतेचा विषय आहे. ओबीसी हक्कांसाठीची त्यांची दीर्घकालीन बांधिलकी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक महत्त्व कमी लेखता येणार नाही. मात्र, प्रश्न असा आहे की भुजबळ यांच्या राजकीय प्रवासाला नवीन दिशा मिळेल का? की हा त्यांच्या प्रभावाच्या घटण्याचा काळ आहे? या आव्हानांवर मात करून भुजबळ पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळवतील का, याचे उत्तर काळच देईल. छगन भुजबळ यांचे राजकारण संपून जाईल, की ते पुन्हा नव्याने उभे राहून राज्याच्या पातळीवर आपला प्रभाव निर्माण करतील, हे पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
हेही वाचा :
– विजय चोरमारे
महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात १२ डिसेंबर २०२४ रोजी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. अजित पवार यांनी कुटुंबीय आणि सहका-यांसह शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली. दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीला केवळ कौटुंबिक पातळीवरची भेट न मानता, ती एक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घटना म्हणून पाहिली गेली. कारण गेल्या सहा-सात महिन्यांच्या ताणलेल्या नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली होती. (Sharad Pawar)
भेटीची पार्श्वभूमी
या बैठकीचा संदर्भ लक्षात घेतल्याशिवाय त्याचे महत्त्व समजणे कठीण आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गेल्या काही महिन्यांत खूपच गुंतागुंतीची झाली आहे. विशेषतः अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) सोडून भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर. काका-पुतण्याच्या नात्यातील तणाव आणि फुटीबाबत अनेक तर्कवितर्क झाले. त्यामुळेच या बैठकीने राजकीय विश्लेषक आणि पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.
भेटीचे तपशील
अजित पवार हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि एनसीपीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले. तुटलेल्या नातेसंबंधांना सुधारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे. माध्यमांनीही या घटनेला मोठी बातमी म्हणून प्रसिद्ध केले. या कौटुंबिक तसेच राजकीय भेटीचे महत्त्व त्यामुळे अधोरेखित झाले. (Sharad Pawar)
राजकीय परिणाम
ही भेट झाली, ती वेळही अत्यंत महत्त्वाची होती. एनसीपीच्या भविष्यासंबंधी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आणि महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या दरम्यान ही भेट झाली. या भेटीतून दोन गटांत सलोखा होण्याची शक्यता आहे का, याचे अनेकांचे कुतूहल आहे. त्याच कुतूहलापोटी या भेटीची अधिक चर्चा झाली.
तर्कवितर्क आणि विश्लेषण
राजकीय निरीक्षक या भेटीचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींना वाटते की, या भेटीमुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील कटुता कमी होण्यास मदत होईल. काहींना ही भेट केवळ कौटुंबिक जिव्हाळ्याचे प्रदर्शन आहे असे वाटते. दोन्ही नेत्यांमधील संवाद खंडित झाला होता, तो या भेटीमुळे सुरू झाला आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील लोकांना तो आश्वासक वाटतो. शरद पवार आणि अजित पवार यांचे दीर्घ काळापासूनचे नाते सहकार्याने आणि संघर्षाने भरलेले आहे. विशेषतः अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली. त्यामुळे या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील दिशा आणि निष्ठा याबाबत प्रश्न उपस्थित होतात. (Sharad Pawar)
मागील तणाव आणि त्याचा प्रभाव
अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या नात्यामध्ये दरी निर्माण झाली होती. राजकारण वेगळे आणि कौटुंबिक संबंध वेगळे असे कितीही म्हटले जात असले तरी सहजासहजी ते वेगळे करता येत नाही. अजित पवार यांनी वेगळी वाट चोखाळल्यामळे केवळ त्यांचे वैयक्तिक नाते बिघडले नाही. पक्षाच्या एकात्मतेवर आणि निवडणुकीतील यशावरही परिणाम झाला.
सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती
महाराष्ट्राचे राजकीय वातावरण सध्या खूप गुंतागुंतीचे आहे. भाजप आपले बळ वाढवत आहे, तर एनसीपी पक्ष फाटाफुटीनंतर अडचणीत आहे. आता दोन्ही पक्ष वेगळे असले तरी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादींनी एकसंध राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीकडे पाहिले जाते. या नातेसंबंधांचे राजकीय परिणाम समर्थक आणि विरोधक दोघेही बारकाईने पाहत आहेत.
निष्कर्ष
शरद पवार आणि अजित पवार यांची भेट ही केवळ कौटुंबिक पुनर्मिलन नसून, महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. दोन्ही नेते आपल्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांवर कसा तोडगा काढतात, याचा राज्याच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल. ही घटना भारतीय राजकारणात कौटुंबिक आणि राजकीय नातेसंबंध किती गुंतागुंतीचे असतात, याची जाणीव करून देते. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये संवाद आणि सामंजस्याची महत्त्वाची भूमिका असते. अलीकडच्या काळात राजकारणातील विखार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचे दाखले देणा-या महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात या घटनेचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवते.
भेटीनंतर राजधानी दिल्लीत चर्चांना उधाण आले. शरद पवार गटाचे काही खासदार अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दिल्लीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याच्या वावड्या उठल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या. ते भाजपसोबत जाणार की अजित पवार यांच्या पक्षासोबत जाणार यासंदर्भात दावे केले जाऊ लागले. जर या बातम्यांमध्ये तथ्य असेल तर त्यातूनही काही प्रश्न उपस्थित होतात. भाजपला सध्या महाराष्ट्रातही संख्याबळ नको आहे आणि केंद्राती तेवढी निकड नाही. असे असताना शरद पवार यांचा पक्ष फोडण्याचे प्रयत्न का केले जात असतील, असाही एक प्रश्न आहे. त्याचे उत्तर देताना असे सांगितले जाते की, शरद पवार यांच्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात एक असुरक्षितता आहे. चंद्राबाबू नायडू आणि नीतिश कुमार यांना भाजपपासून वेगळे करण्याची क्षमता सध्याच्या घडीला फक्त शरद पवार या एकमेव नेत्याकडे आहे. त्याची भीती नरेंद्र मोदी-अमित शाह यांना वाटते. त्याचमुळे शरद पवारांना आपल्याकडे घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. pic.twitter.com/6SnkF97upb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2024
हेही वाचा :
Prakash Abitkar : जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले मंत्री प्रकाश आबिटकर
– सतीश घाटगे, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने विपुल असलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीपदाची हॅटट्रीक नोंदवलेल्या प्रकाश आबिटकर यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ गळ्यात पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा पहिला मंत्री आणि राधानगरी मतदारासंघातील पहिला मंत्री म्हणून आमदार आबिटकरांची इतिहासात नोंद झाली आहे. (Prakash Abitkar)
देखणे आणि लोभस व्यक्तिमत असलेल्या प्रकाश आबिटकरांचा गुण हा कायम कार्यकर्त्याचा. एकीकडे शिवसेनेचे नेते, आमदार बाऊन्सर, बॉडीगार्ड, पोलिसांच्या गराड्यात असताना प्रकाश आबिटकर मोकळेपणाने जनतेत वावरतात. त्यामुळे मागील तीन निवडणूकीत नेते एकीकडे आणि जनता एकीकडे असे चित्र राधानगरी मतदारसंघात पहायला मिळाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील भुदरगड किल्ल्याच्या छायेखाली गारगोटी शहरात प्रकाश आबिटकरांची जडणघडण घडली. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत गारगोटीने मोठे योगदान दिले असून हुतात्माचे गाव म्हणून ओळख आहे. करवीरसंस्थानात राजर्षी शाहू महाराजांचे वास्तव्य राधानगरी आणि भुदरगड पेठ्यात असल्याने सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीची ज्योतही याच भागात पेटली. मौनी विद्यापीठातून अनेक विद्यार्थी घडले आणि देशसेवेत रुजू झाले. वयाच्या विसाव्यावर्षी गारगोटीतील युवा संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक कार्यास प्रारंभ केला. शिवाजी विद्यापीठाचे बी.ए. पदवीधर असलेले प्रकाश आबिटकर १९९७ मध्ये भुदरगड पंचायत समितीत अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेतून निवडून आले. जिल्हा परिषदेच्या कामात त्यांनी छाप पाडल्यानंतर भावी आमदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. अभ्यासू व्यक्तीमत्व, कार्यकर्त्यांचे संघटन यामुळे २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली. पहिल्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ३६ हजार ३५९ मते मिळवून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Prakash Abitkar)
२०१४ च्या निवडणूकीत प्रकाश आबिटकर यांच्यावर शिवसेनेची नजर पडली आणि राधानगरी मतदारसंघातून शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून विजयी झाली. त्यांनी आमदार के.पी.पाटील यांचा तब्बल ३९ हजार ४०८ मतांनी पराभव केला. २००९ मध्ये पडलेल्या मताच्या तिप्पट एक लाख ३२ हजार ४८५ मते आबिटकरांनी मिळवली. २०१४ मध्ये जिल्ह्यात आबिटकरांसह, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजीत मिणचेकर, सत्यजीत पाटील, उल्हास पाटील हे सहा आमदार शिवसेनेकडून निवडून आले पण जिल्ह्यात शिवसेनेला मंत्रीपद मिळाले नाही.
२०१९ च्या निवडणूकीत शिवसेनेच्या सहा आमदारांपैकी एकमेव आमदार म्हणून प्रकाश आबिटकर निवडून आले. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आणि ते महायुतीत सहभागी झाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी प्रामाणिक राहिलेल्या आबिटकरांना मोठा निधी मिळाल्याने मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली.
बिद्रीच्या दूधगंगा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत त्यांच्या पॅनेलचा पराभव झाला असला तरी विधानसभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार के.पी. पाटील यांचा पराभव करत प्रकाश आबिटकरांनी आमदारकीची हॅटट्रीक साधली. विधानसभेच्या प्रचारसभेत मंत्रीमंडळातील बॅकलॉग नवीन सरकार आल्यावर पूर्ण केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आबिटकरांना दिलेला शब्द पाळताना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास फोन करुन मंत्रीपदाची शपथ घेण्याचे आमंत्रण दिले. आणि आबिटकरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राधानगरी तालुक्याला पहिल्यांदा आणि जिल्ह्यात शिवसेनेला पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले आहे.
याप्रसंगी सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांचे अभिनंदन करून त्यांना मंत्रिपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचा प्रत्येक मंत्री हा राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कायम कटिबद्ध राहील याची मला पूर्ण खात्री आहे. https://t.co/j6bWDhj4EI pic.twitter.com/MzjTS6Nqew
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 15, 2024
हेही वाचा :
कोल्हापूर : कोल्हापूरचे सुपुत्र मा. नाम चंद्रकांत पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली या नियुक्ती बद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (Chandrakant Patil)
भारतीय जनता पार्टीचा विजय असो, चंद्रकांत दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून हा आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, कोल्हापूरच्या सुपुत्राने सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट पदाची शपथ घेतली आहे यापूर्वी दोन वेळा मिळालेल्या खात्यांची जबाबदारी त्यांनी अतिशय सक्षमपणे सांभाळले आहे आत्तासुद्धा त्यांच्या मंत्रीपदामुळे कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला तसेच दादा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. (Chandrakant Patil)
प्रदेश सचिव महेश जाधव यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचे अभिनंदन केले. चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्याच्या आधारे त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान असून यापूर्वी ज्या पद्धतीने मिळालेल्या खात्यांना न्याय दिला अशाच पद्धतीचे कार्य दादांच्या माध्यमातून होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीत देखील सर्वांनी एकदिलाने कार्य करून महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे सांगितले.
याप्रसंगी अशोक देसाई, विराज चिखलीकर, विशाल शिराळकर, विजयसिंह खाडे पाटील, अजित ठाणेकर, अमर साठे, माधुरी नकाते, संतोष माळी, विजय आगरवाल, राजू मोरे, सयाजी आळवेकर, सतीश आंबर्डेकर, योगेश कांगटणी, सचिन बिरांजे, अजित सूर्यवंशी, अनिल कोळेकर, महेश यादव, ओंकार खराडे, प्रीतम यादव, अरविंद वडगांवकर, सुनील पाटील, रोहित कारंडे, विश्वास जाधव, सचिन घाटगे, विनय खोपडे, बंडा गोसावी, अनिल कामत, विद्या बागडी, प्रग्नेश हमलाई, सुमित पारखे, रवींद्र मुतगी, संग्राम जरग, दिलीप बोन्द्रे, विद्या बनछोडे, पारस पलीचा यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
LIVE
राजभवन, नागपूर
15-12-2024
राज्य मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा – लाईव्ह
https://t.co/IXTqNjR2Ie— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 15, 2024
हेही वाचा :
Hasan Mushrif : मंत्रीमंडळातील एकमेव अल्पसंख्याक मंत्री हसन मुश्रीफ
सतीश घाटगे, कोल्हापूर
प्रत्येक निवडणूकीत मुश्रीफ अडचणीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाही सलग सहाव्यांदा डबल हॅटट्रीक नोंदवणारे कागल मतदारसंघातील आमदार हसन मुश्रीफ चौथ्यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सध्याच्या महायुतीच्या मंत्रीमंडळात ते एकमेव मुस्लीम अल्पसंख्य कॅबिनेट मंत्री आहेत. (Hasan Mushrif)
पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सलग सहावेळा आमदार, वीस वर्षे मंत्रीपद भूषवणाऱ्या हसन मुश्रीफांना राजकारण आणि समाजकारणाचा मोठा अनुभव आहे. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे यांच्या कागल राजकीय विद्यापीठातून तयार झालेले हसन मुश्रीफ १९९९ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झाले. पहिल्यांदा ऑक्टोंबर १९९९ मध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात पधुसंवर्धन, दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.त्यानंतर झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात त्यांच्याकडे जुलै २००४ पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन व दुग्ध विकास, औकाफ खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. डिसेंबर २००८ पासून नगरविकास, जमीन कमाल धारणा, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्यांक विकास (औकाफसह) विधी व न्याय या खात्यांचा कार्यभार मुश्रीफ यांनी सांभाळला आहे.
२००९मध्ये विधानसभेवर सलग तिसऱ्यांदा हसन मुश्रीफ विक्रमी मताने निवडून आले आणि पहिल्यांदा त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. अशोकराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण मंत्रीमंडळात नगरविकास, कमाल जमीन धारणा, पशुसंवर्धन, दुग्ध्यविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्याक विकास (औकाफसह) विधी व न्याय या खात्याचा राज्यमंत्री तसेच; कामगार व जलसंपदा या खात्याचा कॅबिनेटमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे. (Hasan Mushrif)
२०१४ मध्ये ते विधानसभेवर चौथ्यांदा निवडून आले पण राज्यात भाजप महायुतीचे सत्तेवर असल्याने पाच वर्षे ते विरोधी पक्षात होते. २०१९ मध्ये विधानसभेवर सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवड झाली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. अडीच वर्षानंतर राज्यात सत्तांत्तर होऊन एकनाथ शिंदे यांचे मंत्रीमंडळ अस्तित्वात आहे. पण अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन भाजप, शिवसेना महायुतीत प्रवेश केला. त्यानंतर मुश्रीफ यांनी दोन जुलै २०२३ वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य या खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
२०२४ च्या निवडणूकीत महायुतीला भारी बहुमत मिळाले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ मंत्री म्हणून वयाच्या ६८ व्या वर्षी हसन मुश्रीफ यांनी सलग चौथ्यावेळी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. पंचायत समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री असा हसन मुश्रीफ यांचा प्रवास सुरू आहे.
LIVE
राजभवन, नागपूर
15-12-2024
राज्य मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा – लाईव्ह
https://t.co/IXTqNjR2Ie— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 15, 2024
हेही वाचा :
भुजबळ, वळसे-पाटील, मुनगंटीवारांचा पत्ता कट, १६ मराठा-१७ओबीसी मंत्री
नागपूरः भारतीय जनता पक्षाच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विभागनिहाय प्रतिनिधित्व पाहिले तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना धरून विदर्भाला दहा, पश्चिम महाराष्ट्राला ९, मराठवाड्याला ६, उत्तर महाराष्ट्राला ७, कोकणाला ५, ठाणे ३ आणि मुंबई २ अशी मंत्रिपदे वाट्याला आली आहेत. मंत्रिमंडळात चार महिला असून त्यापैकी तीन भाजपच्या आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहेत. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर या जुन्या चेह-यांना डच्चू देण्यात आला आहे. (Maharashtra Government)
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या ४२ झाली आहे. त्यापैकी ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळात जुन्या-नव्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांकडून करण्यात आला असून मंत्रिमंडळातील जवळपास निम्मे सदस्य पहिल्यांदाच मंत्री बनले आहेत. भाजपकडून नऊ तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी पाच नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रिमंडळात समावेश नाही, मात्र त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि धर्मरावबाबा अत्राम या ज्येष्ठांनाही वगळण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्यामुळे सरकारला मराठा आरक्षण आंदोलनाचा नाहक विरोध सहन करावा लागू शकतो, हे कारण असल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेकडूनही दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांना बाजूला ठेवण्यात आले आहे. (Maharashtra Government)
सर्वाधिक सोळा मंत्री मराठा समाजाचे आहेत, तर ओबीसी समाजघटकांमधील सतरा जणांना संधी मिळाली आहे. हसन मुश्रीफ हे मुस्लिम समाजाचे मंत्रीमंडळातील एकमेव प्रतिनिधी आहेत. सामाजिक समीकरणे जुळवण्याचा विशेष प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अजित पवार यांच्यासह मराठा समाजाचे चार, ओबीसी समाजघटकांतील तीन त्यापैकी एक महिला, दोन अनुसूचित जमाती आणि एक मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीचा समावेश आहे. मंत्रिमंडळात चार महिलांना संधी मिळाली असून त्यापैकी पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर या तिघी भाजपच्या आणि आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. पंकजा मुंडे या विधान परिषद सदस्य आहेत. त्यांचे चुलतभाऊ धनंजय मुंडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून शपथ घेतली आहे.
महायुतीतील छोट्या पक्षांच्या प्रतिनिधींना मात्र मंत्रिमंडळात संधी मिळू शकलेली नाही. जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, तसेच रवी राणा यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही. (Maharashtra Government)
राज्याचे नवे मंत्रीमंडळ
(कॅबिनेट मंत्री )
1. चंद्रशेखर बावनकुळे
2. राधाकृष्ण विखे पाटील
3. हसन मुश्रीफ
4. चंद्रकांत पाटील
5. गिरीश महाजन
6. गुलाबराव पाटील
7. गणेश नाईक
8. दादा भुसे
9. संजय राठोड
10. धनंजय मुंडे
11. मंगलप्रभात लोढा
12. उदय सामंत
13. जयकुमार रावळ
14. पंकजा मुंडे
15. अतुल सावे
16. अशोक उईके
17. शंभूराज देसाई
18. आशिष शेलार
19. दत्तात्रय भरणे
20. आदिती तटकरे
21. शिवेंद्रसिंहराजे भोसले
22. माणिकराव कोकाटे
23. जयकुमार गोरे
24. नरहरी झिरवळ
25. संजय सावकारे
26. संजय शिरसाठ
27. प्रताप सरनाईक
28. भरत गोगावले
29.मकरंद पाटील
30. नितेश राणे
31. आकाश फुंडकर
32. बाबासाहेब पाटील
33. प्रकाश आबिटकर
राज्यमंत्री
1.माधुरी मिसाळ
2.आशिष जयस्वाल
3.पंकज भोयर
4.मेघना बोर्डीकर
5.इंद्रनिल नाईक
6.योगेश कदम
………………….
पक्षनिहाय मंत्र्यांची नावे आणि जातवर्गवारी अशीः
भारतीय जनता पक्षः १९
१ चंद्रकांत पाटील (मराठा)
२ मंगलप्रभात लोढा (जैन)
३ राधाकृष्ण विखे पाटील (मराठा)
४ पंकजा मुंडे (वंजारी-ओबीसी)
५ गिरीश महाजन (गु्र्जर -ओबीसी)
६ गणेश नाईक (आगरी – ओबीसी)
७ चंद्रशेखर बावनकुळे (तेली – ओबीसी)
८ आशिष शेलार (मराठा)
९ अतुल सावे (माळी -ओबीसी)
१० संजय सावकारे ( चर्मकार -एससी)
११ अशोक उईके (आदिवासी)
१२ आकाश फुंडकर (कुणबी-ओबीसी)
१३ माधुरी मिसाळ (सीकेपी)
१४ जयकुमार गोरे (माळी -ओबीसी)
१५ मेघना बोर्डीकर (मराठा)
१६ पंकज भोयर ( कुणबी – ओबीसी)
१७ शिवेंद्रराजे भोसले (मराठा)
१८ नितेश राणे (मराठा)
१९ जयकुमार रावळ (राजपूत -ओबीसी)
शिवसेनाः ११
२० दादा भूसे (मराठा)
२१ गुलाबराव पाटील (गुर्जर – ओबीसी)
२२ संजय राठोड (बंजारा -ओबीसी)
२३ उदय सांमत (ब्राह्मण)
२४ शिवसेना शंभूराज देसाई (मराठा)
२५ प्रताप सरनाईक (कुणबी -ओबीसी)
२६ योगेश कदम (मराठा)
२७ आशिष जैस्वाल (कलाल -ओबीसी)
२८ भरत गोगावले (मराठा)
२९ प्रकाश आबिटकर (मराठा)
३० संजय शिरसाट ( बौद्ध – एससी)
राष्ट्रवादी काँग्रेसः ९
३१ हसन मुश्रीफ (मुस्लिम)
३२ आदिती तटकरे (गवळी -ओबीसी)
३३ धनंजय मुंडे (वंजारी – ओबीसी)
३४ दत्तामामा भरणे (धनगर -ओबीसी)
३५ बाबासाहेब पाटील (मराठा)
३६ नरहरी झिरवाळ (आदिवासी)
३७ मकरंद पाटील (मराठा)
३८ इंद्रनील नाईक (बंजारा- ओबीसी)
३९ माणिकराव कोकाटे (मराठा)
LIVE
राजभवन, नागपूर
15-12-2024
राज्य मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा – लाईव्ह
https://t.co/IXTqNjR2Ie— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 15, 2024
हेही वाचा :
सातारा,प्रशांत जाधव : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा आज (दि.१५ ) विस्तार झाला. सत्तेतील ३९ आमदारांपैकी ३३ आमदारांनी कॅबिनेट तर ६ आमदारांनी राज्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून शपथ घेतली. राज्यातील सामाजिक व भौगोलीक समतोल राखत नव्या चेहर्यांना संधी देण्याच्या धोरणात सातारा जिल्ह्याला तब्बल पाच मंत्रिपदे मिळाली आहेत. सातारा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार भगवान गोरे, मकरंद पाटील यांच्या रूपाने पाच मंत्रीपदे मिळाल्याने जिल्ह्याचा राज्याच्या मंत्रीमंडळात दबदबा दिसून आला आहे. परिणामी पाचही मंत्र्याकडून जिल्ह्यातील नागरिकांच्या आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. (Maharashtra Cabinet Expansion)
राज्याच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर नेहमीच सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांचा वरचष्मा दिसून आला आहे. त्यातही सांगली जिल्ह्यात एकाचवेळी जास्त मंत्री असल्याचे अनेकदा दिसून आले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात याच सांगली जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळाले नाही. त्याउलट कायम एखाद्या मंत्रीपदावर समाधान मानावे लागलेल्या सातारा जिल्ह्याने यावेळी मोठी बाजी मारली आहे. राज्याचे विद्यामान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी ठाण्यातून निवडून आले असले तरी मुळचे सातार्याचे आहेत. त्यांच्यासह विद्यमान मंत्री शंभूराज देसाई, सातारा मतदार संघाचे आमदार छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणचे आमदार जयकुमार गोरे, वाईचे आमदार मकरंद पाटील असे एकूण पाच मंत्री सातारा जिल्ह्याला मिळाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मंत्री जिल्ह्याला मिळाल्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसह मोठमोठ्या प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी जिल्ह्यातील नागरिकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा राहणार आहेत.
शंभूराज देसाई
शंभूराज देसाई हे पाटण मतदार संघाचे चौथ्यांदा आमदार असून लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांचे नातू आहेत. माजी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांचे अतंत्य जवळचे म्हणून राज्याला त्यांची ओळख आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात गृहराज्य मंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात उत्पादन शुल्क विभागाचे कॅबिनेट मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सहकार परिषदेचे अध्यक्षपद देवून राज्याच्या राजकारणात सक्रिय केले होते. (Maharashtra Cabinet Expansion)
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
शिवेंद्रसिंहराजे भोसले हे माजी मंत्री स्व.छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचे सुपूत्र असून ते सातारा विधानसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. त्यांचे सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वर्चस्व असून सातारा जिल्हा बँकेत त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. २००४ ते २०१४ ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले तर २०१९ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता.
जयकुमार गोरे
जयकुमार गोरे हे माण मतदार संघातून सलग चौथ्यांदा निवडून आले असून पवार विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जयकुमार गोरे हे २००९ साली अपक्ष, २०१४ साली काँग्रेसमधून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ साली भाजपात प्रवेश करून त्यांनी निवडणुकांमध्ये विजय मिळवला. एक सर्वसामान्य तरूण आणि पाणी प्रश्नासाठी धडपडणारा आमदार म्हणून त्यांना देवेंद्र फडणवीस यांचे नेहमीच पाठबळ राहीले आहे. जयकुमार गोरे यांचा सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर,कोरेगाव,माण,फलटण या मतदारसंघासह माढा लोकसभा मतदार संघातही प्रभाव असून त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. (Maharashtra Cabinet Expansion)
मकरंद पाटील
मकरंद पाटील हे स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे सुपूत्र असून ते वाई मतदार संघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. २००९ साली ते अपक्ष म्हणून निवडून आले व त्यानंतर ते राष्ट्रवादी काँगे्रसकडून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी श्री.छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे काम केले होते. त्यांनतर त्यांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. सातारा जिल्हा बँकेतही पाटील यांचे वर्चस्व आहे.
LIVE
राजभवन, नागपूर
15-12-2024
राज्य मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा – लाईव्ह
https://t.co/IXTqNjR2Ie— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 15, 2024
हेही वाचा :
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूरच्या राजभवन परिसरात संपन्न झाला. आज (दि.१५) महायुतीच्या ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप-१९, शिवसेना-११ आणि राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महायुतीने मंत्रीमंडळात चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet Expansion)
शपथ घेतलेले मंत्री असे
चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाब पाटील, गणेश नाईक, दादा भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगल प्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, डॉ. अशोक उईके, शंभूराज देसाई, आशिष शेलार, दत्तात्रेय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव-पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, योगेश कदम. (Maharashtra Cabinet Expansion)
LIVE
राजभवन, नागपूर
15-12-2024
राज्य मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा – लाईव्ह
https://t.co/IXTqNjR2Ie— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 15, 2024
हेही वाचा :