कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रीत सीनियर महिला टी ट्वेंटी लिग क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाला उपविजेतेपद मिळाले. अंतिम सामन्यात ज्युडीशियल महिला संघांने कोल्हापूर जिल्हा संघाचा ४८ धावांनी पराभव केला.( MCA cricket)
पुणे येथे झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलदांजी करताना ज्युडीशियल महिला संघाने २० षटकांत ४ बाद १७३ धावा केल्या. यामध्ये गौतमी नार्इकने उत्कृष्ट फलंदाजी करत ८२ धावांची खेळी केली. सायली लोणकरने नाबाद ३३, भाविका अहिरेने ३१ व आयशा शेख ११ धावा केल्या. कोल्हापूर जिल्हा संघाकडून सेजल सुतार व सौम्यलता बिराजदार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ( MCA cricket)
उत्तरादाखल खेळताना कोल्हापूर जिल्हा महिला संघाने २० षटकांत ८ बाद १२५ धावा केल्या. यामध्ये अनुजा पाटीलने ४४, शिवाली शिंदेने ३९, सौम्यालता बिराजदारने १७ धावा केल्या. ज्युडीशियल महिला संघाकडून सायली लोणकरने तीन, गौतमी नार्इक आणि पिनु एकता यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. ज्युडीशियल महिला संघाने ४८ धावानी विजय संपादन केला. ( MCA cricket)
कोल्हापूर जिल्हा महिला संघाने या स्पर्धेत सात सामन्यात सहा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
विजयी संघ : अनुजा पाटील (कर्णधार), शिवाली शिंदे, अभिलाषा पाटील, अक्षता नरतवडेकर, तनिष्का माळी, आदिती गायकवाड, अंकिता भारती, मुस्कान खटवाणी, सेजल सुतार, सौम्यलता बिराजदार, संजना वाघमोडे, र्इश्वरी राणे, परिणीता पाटील, योगिता रेडेकर, मधुरा इंगवले, संघ व्यवस्थापक मुद्दस्सर मुल्ला.
हेही वाचा :
विराट दुसऱ्या वन-डेमध्ये खेळणार
मुलाणी, कोटियनने मुंबईला सावरले