पुणे : प्रतिनिधी : संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष मोरे उर्फ शिरीष महाराज यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ते तीस वर्षाचे होते. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. देह रोड पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे. (Suicide)
आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली असून आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक केला आहे. शिरीष मोरे यांचा साखरपुडा झाला आहे. वीस फेब्रुवारीला त्यांचा विवाह होता. त्यांच्या निधनाने देहू गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Suicide)
मंगळवारी रात्री शिरीष मोरे जेवणानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. बुधवारी सकाळी बराच वेळ ते बाहेर आले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला पण खोलीतून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी शिरीष मोरे यांनी गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. खोलीत एक सुसाईड नोट सापडली असून देहूरोड पोलिस तपास करत आहेत. (Suicide)
शिरीष मोरे यांची ओळख शिरीष महाराज अशी होती. ते संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज आहेत. उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करत होते. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह होते. मात्र त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. देहरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी शिरीष महाराजांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.
हेही वाचा :
यासाठी ‘तिरुपती’च्या १८ कर्मचाऱ्यांची बदली