Home » Blog » Srilanka Test : श्रीलंकेवर पराभवाचे सावट

Srilanka Test : श्रीलंकेवर पराभवाचे सावट

दुसऱ्या डावात अवघ्या ५४ धावांची आघाडी; मॅथ्यूजचे अर्धशतक

by प्रतिनिधी
0 comments
Srilanka Test

गॉल : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वॉर्न-मुरलीधरन मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान श्रीलंकेचा संघ पराभवाच्या सावटाखाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १५७ धावांच्या आघाडीला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेच्या शनिवारी तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ८ बाद २११ धावा झाल्या होत्या. श्रीलंकेकडे अवघ्या ५४ धावांची आघाडी आहे. (Srilanka Test)

दुसऱ्या डावामध्ये अँजलो मॅथ्यूज आणि कुसल मेंडिस वगळता श्रीलंकेचे अन्य फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. अनुभवी मॅथ्यूज १४९ चेंडूंमध्ये ४ चौकार व एका षटकारासह ७६ धावांची खेळी केली. त्याने मेंडिससोबत सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारीही रचली. दिवसाच्या अखेरच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर प्रबथ जयसूर्या बाद झाल्यानंतर खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी, मेंडिस ५० चेंडूंमध्ये ५ चौकार व एका षटकारासह ४८ धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मॅथ्यू कुन्हेमनने ४, तर नॅथन लायनने ३ विकेट घेतल्या. याबरोबरच लायनने कसोटी कारकिर्दीतील ५५० विकेटचा टप्पाही ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोलंदाज आहे. त्याच्यापूर्वी शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा यांनी हा टप्पा ओलांडला आहे. (Srilanka Test)

तत्पूर्वी, पहिल्या सत्रात, ऑस्ट्रेलियाने ३ बाद ३३० धावांवरून खेळ पुढे सुरू करून पहिल्या डावात ४१४ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी नाबाद राहिलेले स्मिथ, केरी हे शतकवीर शनिवारी वैयक्तिक धावसंख्येत अनुक्रमे १० व १६ धावांची भर घालून बाद झाले. स्टीव्ह स्मिथने १३१ धावा केल्या, तर ॲलेक्स केरीने १५६ धावा करून कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी केली. श्रीलंकेकडून जयसूर्याने १५१ धावांत ५ विकेट घेतल्या. पिरीसने तीन आणि रमेश मेंडिसने दोन विकेट घेऊन त्याला उपयुक्त साथ दिली. (Srilanka Test)

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका – पहिला डाव २५७ आणि दुसरा डाव – ६२.१ षटकांत ८ बाद २११ (अँजलो मॅथ्यूज ७६, कुसल मेंडिस खेळत आहे ४८, धनंजया डिसिल्वा २३, मॅथ्यू कुन्हेमन ४-५२, नाथन लायन ३-८०) विरुद्ध ऑस्ट्रेलिया – पहिला डाव १०६.४ षटकांत सर्वबाद ४१४ (स्टीव्ह स्मिथ १३१, ॲलेक्स कॅरी १५६. ब्यू वेबस्टर ३१, प्रबथ जयसूर्या ५-१५१, निशान पिरीस ३-९४).

हेही वाचा :

 ‘जीतो बाजी खेल के…’

ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ, कॅरीची शतके

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00