Home » Blog » Shivaji Vetal Maal Football : ‘शिवाजी’, ‘वेताळमाळ’ संघांचे विजय

Shivaji Vetal Maal Football : ‘शिवाजी’, ‘वेताळमाळ’ संघांचे विजय

केएसए वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
Shivaj, Vetal Maal Football

कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळाने सम्राटनगर स्पोर्टस् क्लबवर ३-० असा सहज विजय मिळवला. वेताळमाळ तालीम मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा ३-२ असा पराभव केला. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए वरिष्ठ अ गट साखळी फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Shivaji Vetal Maal Football)

बलाढ्य शिवाजी तरुण मंडळाला सम्राटनगर स्पोर्टसने पूर्वार्धात शून्य गोलबरोबरीत रोखले. उत्तरार्धात शिवाजी संघाचा धडाका सुरू झाला. दोन सामन्याची बंदी असलेला खेळाडू करण चव्हाण या हंगामात प्रथमच मैदानात उतरला. त्याने ४३ व्या मिनिटाला गोल करत हंगामात झकास सुरुवात केली. त्यानंतर तीनच मिनिटात इंद्रजीत चौगुलने ४६ व्या मिनिटाला शिवाजी संघाचा दुसरा गोल केला. ५७ व्या मिनिटाला संकेत नितीन साळोखेने तिसऱ्या गोलची नोंद केली. तीन गोलची घसघशीत आघाडी कायम टिकवत शिवाजीने सामना जिंकून तीन गुण वसूल केले. त्यांचे तीन सामन्यात नऊ गुण झाले आहेत.(Shivaji Vetal Maal Football)

दुपारच्या सत्रात वेताळमाळ आणि फुलेवाडी यांच्यात सामना झाला. सलग दुसऱ्या दिवशी सामना खेळणाऱ्या वेताळमाळ संघाने चिकाटीने खेळ करत विजयश्री खेचून आणली. सामन्याच्या आठव्या मिनिटाला आकाश माळीने गोल करत वेताळमाळ संघाचे खाते खोलले. २८ व्या मिनिटाला सर्वेश वाडकरने दुसऱ्या गोलची नोंद केली. मध्यंत्तरास वेताळमाळ संघ २-० असा आघाडीवर होता.(Shivaji Vetal Maal Football)

उत्तरार्धात बरोबरी साधण्यासाठी फुलेवाडी संघ मैदानात उतरला. ६८ व्या मिनिटाला फुलेवाडीकडून अलेश सावंतने गोल केला. बरोबरी साधण्यासाठी फुलेवाडीने जोरदार प्रयत्न केले. ७५ व्या मिनिटाला वेताळमाळने फुलेवाडीला धक्का दिला. त्यांच्या अभिषेक सावंतने वेताळमाळच्या तिसऱ्या गोलची नोंद केली. पण त्यानंतर अवघ्या तीन मिनिटातच ७८ व्या मिनिटाला फुलेवाडीच्या मंगेश दिवसेने गोल करत आघाडी कमी केली. सामन्यातील शेवटच्या पाच मिनिटामध्ये फुलेवाडीने गोल नोंदवण्यासाठी जोरदार चढाया केल्या. पण वेताळमाळने भक्कम बचाव ठेवत एक गोलची आघाडी कायम टिकवली आणि सामना ३-१ अशा फरकाने जिंकला. सलग दोन दिवस वेताळमाळने सामना जिंकत सहा गुणांची कमाई कली.

शनिवारचे सामने

  • पहिला सामना, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब वि. पाटाकडील तालीम मंडळ ब :  दुपारी २.०० वा.
  • दुसरा सामना, पाटाकडील तालीम मंडळ अ वि. संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल क्लब : दुपारी ४.०० वा.

हेही वाचा : 

 सात्विक-चिराग जोडीची उपांत्य फेरीत धडक

भारतीय महिलांची विजयी सलामी

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00