Home » Blog » मंत्री गोरे यांच्या हॉटेलसाठी शक्तीपीठ महामार्ग वळवला : राजू शेट्टी

मंत्री गोरे यांच्या हॉटेलसाठी शक्तीपीठ महामार्ग वळवला : राजू शेट्टी

by प्रतिनिधी
0 comments
Shaktipeeth Highway was diverted for a minister's hotel

कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातून मूळ नियोजित नसलेला शक्तीपीठ महामार्ग जाणीवपूर्वक वळवण्यात आला आहे. हा बदल मंत्री जयकुमार गोरे यांच्या पंचतारांकित हॉटेलला फायदा पोहोचवण्यासाठी आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्यामुळे करण्यात आला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. कोल्हापूरातील कसबा बावडा येथे शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या मेळाव्यात ते बोलत होते. शक्तीपीठ महामार्गाला पूर्ण ताकदीने विरोध करण्यासाठी नऊ जून रोजी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. लाठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार मेळाव्यात सर्व नेते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरी मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याला आमदार सतेज पाटील, जयंत आसगांवकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार के.पी.पाटील, संपतराव पवार पाटील, राजीव आवळे, राजू आवळे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.  (Shaktipeeth Highway was diverted for a minister’s hotel)

मुख्यमंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या मुळावर

मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा ड्रीम पोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे. या प्रकल्पाच्याविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाच्या मार्गाने लढा दिला जाणार आहे. जिल्ह्यात तालुका निहाय मेळावे घेतले जातील. महामार्गाला विरोध करणारी लिखित पत्रे तालुक्याशी संबधित प्रातांधिकाऱ्यांना सादर केली जातील. त्यानंतर नऊ जून रोजी कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर भव्य मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चाची ताकद पाहून मुख्यमंत्री हे स्वत:च शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करतील, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. (Shaktipeeth Highway was diverted for a minister’s hotel)

निवडणूक जिंकण्यासाठी ५५ हजार कोटींचा ढपला

२०२९ ची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी या शक्तीपीठ महामार्गातून ५५ हजार कोटी रुपयांचा ढपला पाडणार आहेत. काहींना आगाऊ रक्कमाही दिल्या आहेत, असा आरोपही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शक्तीपीठ महामार्गावर होणारा एक लाख १० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा सर्वसामान्यांवर पडणार आहे. या महामार्गामुळे सोळा हजार एकर बागायत जमिनीचे प्रचंड नुकसान होणार आहे. महापुराचा धोका वाढणार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शक्तीपीठ समर्थनात लाभापोटी, काही उंदरे बिळातून बाहेर पडत आहेत. मात्र शेतकऱ्यांचे जीवनमान उद्धवस्त करणारा हा महामार्ग कदापी होऊ देणार नाही.

यावेळी माजी आमदार के.पी.पाटील, संपतराव पवार, उद्धव ठाकरे शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, समन्वयक गिरीश फोंडे, उदय नारकर, धैयर्शिल पाटील, राहूल देसाई, सदाशिव चरापले, अतुल दिघे, संपत देसाई, शिवाजी मगदूम, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील यांची भाषणे झाली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय.पाटील, यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (Shaktipeeth Highway was diverted for a minister’s hotel)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00