Home » Blog » Shahu Chhatrapati Birthday : खासदार शाहू छत्रपतींवर शुभेच्छांचा वर्षाव

Shahu Chhatrapati Birthday : खासदार शाहू छत्रपतींवर शुभेच्छांचा वर्षाव

वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतील नागरिकांकडून शुभेच्छा; न्यू पॅलेसचा आवार मान्यवरांच्या गर्दीने फुलला

by प्रतिनिधी
0 comments
Shahu Chhatrapati Birthday

कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार शाहू छत्रपती यांचा वाढदिवस मंगळवारी (७ जानेवारी) उत्साहात साजरा झाला. सर्वस्तरांतील नागिरकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिग्गज राजकीय नेत्यांसह राजकीय, सामाजिक, उद्योग, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. न्यू पॅलेस नर्सरी बागेत शाहू छत्रपतींनी शुभेच्छा स्वीकारल्या. (Shahu Chhatrapati Birthday )

शाहू छत्रपतींच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला लोकसभा निवडणुकीतील विजयाची किनार पहायला मिळाली. काँग्रेस पक्षासह सर्व राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त शाहू छत्रपतींनी सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. बालवाडीपासून ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी स्वत: तयार केलेल्या भेटकार्ड आणि वस्तू शाहू महाराजांना भेट दिल्या.(Shahu Chhatrapati Birthday )

विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा स्वीकारुन खासदार शाहू छत्रपतींचे नर्सरी बागेत आगमन झाले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, यशस्विनी राजे, यश राजे प्रमुख उपस्थित होते.(Shahu Chhatrapati Birthday )

विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय, माजी आमदार संजयबाबा घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, हिंदकेसरी विनोद चौगुले, उद्योजक बाळ पाटणकर, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, अजित नरके, जिल्हा बँक संचालक ए. वाय. पाटील, दूधगंगा साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई, अर्बन बँकेचे संचालक ॲड. प्रशांत शिंदे, विश्वविजय खानविलकर, प्रिन्स शिवाजी बोर्डिंगचे चेअरमन के. जी. पाटील, स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, दळवीज इन्स्टिट्यूटचे अजेय दळवी, विजय टिपुगडे, कॉ. सतीश कांबळे, बाबा इंदूलकर, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, माजी उपमहापौर विक्रम जरग, अर्जुन माने, नगरसेवक संजय मोहिते, विनायक फाळके, राजाराम गायकवाड यांच्यासह सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा :

दिल्लीचा बिगुल वाजला

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00