Home » Blog » School bus stuck in flood: स्कूल बसच्या ‘त्या’ घटनेने पालकांच्या काळजाचा चुकला ठोका!

School bus stuck in flood: स्कूल बसच्या ‘त्या’ घटनेने पालकांच्या काळजाचा चुकला ठोका!

by प्रतिनिधी
0 comments
School bus stuck in flood

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी (१८ ऑगस्ट) मुंबईची तुंबई केली आहे. अशातच पालकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी थरारक घटना घडली. सहा मुले आणि दोन कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एक स्कूल बस पाणी साचलेल्या रस्त्यावर अडकली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच पालकांच्या काळजाचा ठोका चुकला. (School bus stuck in flood)

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व मुले आणि अन्य दोघांना वाचवण्यात आले.

संततधार पावसामुळे सकाळच्या शिफ्ट चालविणाऱ्या शाळांनी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर घरी पाठवण्यात आली.

मुसळधार पावसाने मुंबईतील रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले आहे. अशातच माटुंगा परिसरात साचलेल्या पाण्यात खाजगी स्कूल बस अडकली. जवळपास ३० मिनिटांहून अधिक काळ अडकून राहिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्वांची सुखरूप सुटका केली. (School bus stuck in flood)

नंतर मुलांना सुरक्षिततेसाठी माटुंगा पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

मुसळधार पावसामुळे शहराच्या काही भागात पूरसदृश्य स्थिती आहे. दृश्यमानता कमी झाली आहे. या परिस्थितीत अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. प्रवासाचे काळजीपूर्वक नियोजन करण्याचे आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (School bus stuck in flood)

‘‘आमचे अधिकारी आणि कर्मचारी सतर्क आहेत, आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास मदत करण्यास सज्ज आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कृपया १०० / ११२ / १०३ वर कॉल करा. नागरिकांच्या सुरक्षेला आम्ही नेहमीच प्राधान्य देतो,’’ असे पोलिसांनी सांगितले.

सध्या महानगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. आयएमडीने रेड अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिकेने (बीएमसी) मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दुसऱ्या शिफ्टमध्ये (दुपारी १२ नंतर) सुट्टी जाहीर केली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00