Home » Blog » Sapkal reacts: सपकाळांकडून भाजपला ‘हे’ प्रत्युत्तर

Sapkal reacts: सपकाळांकडून भाजपला ‘हे’ प्रत्युत्तर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रत्युत्तर

by प्रतिनिधी
0 comments
Sapkal reacts

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रविवीरी (१६ मार्च ) जोरदार टीका केली होती. फडणवीसांचा कारभार औरंगजेबासारखाच क्रूर असल्याची विखारी टीका त्यांनी केली होती. त्यावर सपकाळ यांना भाजप नेत्यांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. सपकाळ यांनी आपण केलेल्या टीकेसंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. मी फडणवीसांवर व्यक्तिगत टीका केली नाही, पण आता भाजपच्याच लोकांकडून फडणवीसांची तुलना औरंगजेबाबरोबर केली जात आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. (Sapkal reacts)

सपकाळ यांनी सोमवारी (१७ मार्च) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘‘मी फडणवीसांच्या कारभारावरून टीका केली होती, वैयक्तिक टीका केलेली नाही. मात्र, भाजपाच्याच लोकांनी फडणवीसांची तुलना औरंगजेबाबरोबर केली,’’ असे ते म्हणाले.

सपकाळ यांचे स्पष्टीकरण

‘‘औरंगजेब नक्कीच क्रूर होता. याबाबत दुमत नाही. तो जेवढा क्रूर होता, तेवढाच क्रूर देवेंद्र फडणवीस सरकारचा सरकारचा कारभार आहे. मात्र, या विधानाने भाजपाची पोटदुखी का झाली हे समजत नाही. मी फडणवीसांना काहीही विचित्र बोललो नाही. त्यांच्याविरोधात अपशब्दही वापरले नाहीत. त्यांचा एकेरी उल्लेखही केला नाही. मी केवळ त्यांच्या कारभारावर टिप्पणी केली,’’ असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. (Sapkal reacts)

ते म्हणाले, ‘‘ राज्यात रोज नवनवी प्रकरणे बाहेर येत आहेत. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड, स्वारगेट प्रकरण, केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्याशी गैरवर्तन, कोयता गँग, खोका गँग, ही काही ताजी उदाहरणे आहेत. सरकारचे घोटाळेही बाहेर येत आहेत. राज्यात हिंसाचार आणि भ्रष्टाचाराचा उद्रेक पाहायला मिळतो आहे. तो अत्यंत वाईट आणि क्रूर आहे. त्यामुळे जसा औरंगजेबाचा कारभार होता, तसाच फडणवीस यांचा कारभार आहे, असे मी म्हणालो होतो.’’ (Sapkal reacts)

मग अस्मिता लयास जात नाही का?
माझी तुलनाही ही राज्यकाराभाराबाबत होती, याचा पुनरूच्चार करून ते म्हणाले, पण सरसकट भाजपाच्या नेत्यांनी फडणवीसांना औरंगजेब केले. चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर देताना, फडणवीसांबाबत बोलले तर महाराष्ट्राची अस्मिता लयास जाते तर मग शिवाजी महाराजांबाबत बोलले तर महाराष्ट्राची अस्मिता लयास जात नाही का? असा सवाल त्यांनी बावनकुळे यांना केला.


हेही वाचा :
औरंगजेबाचे महिमामंडन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00