Home » Blog » खानापूर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले

खानापूर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले

Sangli News : येरळा नदीच्या पाणीपातळी वाढ; रब्बी हंगाम रखडला

by प्रतिनिधी
0 comments
Sangli News File Photo

विटा; प्रतिनिधी : आळसंद परिसराला मंगळवारी (ता. १५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास परतीच्या पावसाने झोडपले. परिणामी, येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामापूर – कमळापूर पूल पून्हा पाण्याखाली गेला आहे. बळिराजा स्मृती धरण ही पाण्याखाली गेले आहे. खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिके पाण्याखाली गेली आहेत. ऊसाच्या सरीत पाणी साचून राहिले आहे. खरीप हंगाम वाया तर रब्बी हंगाम परतीच्या पावसाने लांबणीवर पडला आहे. भाळवणी मंडलमध्ये सरासरी ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Sangli News)

बलवडी, तांदळगाव, आळसंद, जाधवनगर, कमळापूर, भाळवणी परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे येरळा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील ओढे नाले सिमेंट बंधारे भरुन वाहू लागले आहेत. खरीप हंगामात काढणी आलेले सोयाबिन , भुईमूग , कडधान्ये पाण्याखाली गेली आहेत. मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. त्या कालावधीत शेतकऱ्यांनी पिकांची काढणी केली. मळणी झाली नव्हती. अशा अस्वस्थेत असणारी पिके पाण्याखाली गेली आहेत. भुईमूगाच्या शेंगा उगविण्यास सुरुवात झाली आहे.

परतीचा पाऊस रब्बी हंगामाला दिलासादायक आहे. विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. येरळा नदी पाण्याने तुडुंब भरून वाहू लागली आहे. ‘ बळिराजा ‘ धरण पाण्या खाली गेले आहे. पाणी पाण्यास गर्दी होत आहे. (Sangli News)

नागेवाडी – गोडाचीवाडी गावांचा संपर्क तुटला

तालुक्यात मंगळवारी (दि.१५) रात्री जोरदार पाऊस झाला. नागेवाडी – गोडाचीवाडी यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. ओढ्याला जोरदार पाणी आल्याने पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढ्यावरुन कोणीही वाहतूक करू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तालुक्यातील मंडल निहाय पावसाची आकडेवारी (मिलिमीटरमध्ये) :

 १५ ऑक्टोबर २०२४

  • खानापूर : ४०.६
  • करंजे : ६२. ९
  • लेंगरे : ३५. २
  • विटा : ५७. १
  • भाळवणी: ६४. ७

सरासरी पाऊस : ५०

” बलवडी परिसरात परतीचा पाऊस चांगला झाला आहे. विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. येरळानदी पाणी पातळीत वाढ झाली आहे. उपलब्ध पाणी रब्बी हंगामातील पिकांना लाभदायक आहे.”

मानसिंग जाधव ( शेतकरी ,जाधवनगर )

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00