कोल्हापूर : प्रतिनिधी : मोक्का कारवाईतील प्रमुख आरोपी सम्राट कोराणे तब्बल पाच वर्षानंतर न्यायालयात शरण आला. न्यायालयाने त्याची रवानगी कळंबा कारागृहात केली असून उद्या, गुरुवारपासून शहर पोलीस अधीक्षक अजित टिके त्यांची मोक्का कायद्या अंतर्गत चौकशी करणार आहेत. सम्राट कोराणे गेले पाच वर्षे देशात होता की देशाबाहेर होता याचा पोलिस तपास करण्याची शक्यता आहे. (Samrat korane)
९ एप्रिल २०१९ मध्ये तत्कालिन प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी मटकाविरोधात यादवनगरात कारवाई केली होती. कारवाईवेळी पोलिसांच्या पथकावर हल्ला झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४४ जणांना वर मोक्का लावला होता. त्यातील सम्राट कोराणे आणि पप्पू सावला पोलिसांच्या ताब्यात सापडले होते. सुप्रिम कोर्टाने २०२२ मध्ये त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज बुधवारी तो न्यायालयात शरण आला. (Samrat korane)
मटकाविरोधातील कारवाईवेळी सहायक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकावर मटक्याच्या संबंधित आरोपींनी हल्ला केला होता. यावेळी पोलिसांचे रिव्हाल्व्हर आरोपींनी हिसकावून घेतले होते. पोलिसांनी माजी उपमहापौर शमा मुल्ला, त्यांचे पती सलीम मुल्ला यांच्यासह ४४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी तपास केला होता. या गुन्हयातील संशयित सम्राट कोराण आणि पप्पू सावला पोलिसांच्या हाती लागली नव्हते. सम्राट कोराणे आणि त्यांच्या साथीदारांनी मोक्काअंतर्गत कारवाईच्या विरोधात सर्वाच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांची याचिका फेटाळली होती. त्यामुळे सम्राट कोराणेच्या अटकेची कारवाई अटळ होती.
सर्वोच्च न्यायालयात याचिका फेटाळल्यानंतरही अडीच वर्षे सम्राट कोराणे पोलिसांच्या हाती लागला नव्हता. आज तो न्यायालयात शरण आला. शहर पोलीस अधीक्षक अजित टिके या गुन्ह्याचा तपास करणार आहेत. सम्राट कोराणे गेले पाच वर्षे देशात होता की देशाबाहेर होता याचा पोलीस तपास करण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यातील ४१ जणांना जामीन मंजूर झाला असून एक आरोपी मयत झाला आहे.
हेही वाचा :