कोल्हापूरः कागलच्या समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाशी असलेले संबंध तोडल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर समरजित घाटगे भाजपमध्ये परत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. रविवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमधून त्यांच्याकडून तसे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. (samarjit Ghatge)
विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा आधार
समरजित घाटगे (samarjit Ghatge) हे कागल मतदार संघात मंत्री हसन मुश्रीफ यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. मुश्रीफ यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी सुरू होती. भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavees), चंद्रकांतदादा पाटील (Chandrakantdada Patil) या नेत्यांनी त्यांना त्यासाठी ताकद दिली होती. मात्र अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा गट महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाला. समरजित घाटगे यांच्या राजकीय वाटचालीसाठी हा मोठा धक्का होता. कारण अजित पवार यांच्यासोबत हसन मुश्रीफही भाजपसोबत आले आणि महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री झाले.
Guardian Minister : पालकमंत्रिपदाच्या यादीतून धनंजय मुंडेंना वगळले
अजितदादांच्या निर्णयानंतर समीकरणे बदलली
एकाच आघाडीत दोघे आले. जागावाटपाच्या सूत्रानुसार विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्याचे निश्चित होते. स्वाभाविकपणे हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित होती. समरजित घाटगे (samarjit Ghatge) यांना कोणत्याही परिस्थितीत मुश्रीफ यांच्याविरोधात लढायचे होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असूनही तालुक्यातील राजकीय अस्तित्वासाठी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी शरद्चंद्र पवार पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झाला. त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी स्वतः शरद पवार आले होते. शिवाय शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आदी वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा प्रचार केला होता. परंतु अवघ्या चार महिन्यात त्यांनी पक्षापासून फारकत घेतल्याचे दिसत आहे. (samarjit Ghatge back to bjp )
विधानसभा निवडणुकीत घाटगे यांचा पराभव झाला. तसेच राज्यातही मोठ्या बहुमताने महायुतीचा विजय झाला. त्यामुळे भाजपमधून अन्य पक्षात गेलेल्या नेत्यांच्या परतीची चर्चा सुरू झाली. त्यामध्ये प्रामुख्याने हर्षवर्धन पाटील, समरजित घाटगे (samarjit Ghatge) पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या चर्चेला जोर आला. दोघांनीही त्यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले नसले तरी त्यादृष्टिने काही संकेत मिळत होते.
वाढदिवसाच्या जाहिरातींद्वारे संकेत
समरजित घाटगे (samarjit Ghatge) यांचा रविवारी (१९ जानेवारी) वाढदिवस आहे. त्यानिमित्त स्थानिक वृत्तपत्रांमधून त्यांच्या शुभेच्छा जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. यापैकी कोणत्याही जाहिरातीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख नाही. किंवा पक्षाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वगैरेंचे छायाचित्र नाही. काही जाहिरातींमधून दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांची छायाचित्रे आहेत. एरव्ही राजकीय नेत्याच्या वाढदिवसाच्या जाहिरातीमध्ये संबंधित पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रे असतात. परंतु समरजित घाटगे यांच्या वाढदिवसाच्या एकाही जाहिरातीमध्ये पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे छायाचित्र नाही.
घाटगे यांनी राष्ट्रवादीशी संबंध तोडल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे आधीपासून चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये परत जातील, असे मानले जात होते. परंतु निवडणुकीनंतर अवघ्या दोनच महिन्यांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतल्याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. (samarjit Ghatge)
हेही वाचा:
Ladaki Bahin : लाडक्या बहिणींना २६ जानेवारीपर्यंत हप्ता