कोल्हापूर : प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. यशवंत निवास आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, साळोखेनगर येथे ऋतुराज पाटील याना शुभेच्छा देण्यासाठी आजी- माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, हितचिंतक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांची मोठी गर्दी केली होती. (Ruturaj Patil)
ऋतुराज पाटील यांनी सकाळी आजोबा माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण करून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. शांतादेवी पाटील, डी. वाय. पाटील समुहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, सौ. वैजयंती पाटील, आमदार सतेज पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील आदी उपस्थित होते. (Ruturaj Patil)
सकाळच्या सत्रात कसबा बावड्यातील यशवंत निवासस्थानी तर सायंकाळी साळोखेनगर येथील डी. वाय पाटील कॉलेज येथे पाटील यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. माजी आमदार के. पी. पाटील, राजीव आवळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, गोशिमा चेअरमन दीपक चोरगे, मौनी विद्यापीठ चेअरमन मधुकर देसाई, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, विजय देवणे, आर. के. पोवार, सुनील मोदी, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक करणसिंह गायकवाड, अजित नरके,बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगुले, एस आर पाटील, राजेंद्र मोरे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, प्रा. सुनील शिंत्रे, राहुल खंजिरे, शशिकांत खवरे, सत्यजित जाधव, दौलत देसाई, स्थायी समिती माजी सभापती राजू लाटकर, भूपाल शेटे, माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, राहुल माने, मधुकर रामाणे, संदीप नेजदार, प्रताप जाधव यांच्यासह विविध माजी नगरसेवक, दुर्वास कदम, अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, आर. एस. कांबळे, मानसिंग बोंद्रे, मंजित माने, विराज पाटील, राजवीर नरके, भारत पाटील भूयेकर, सुयोग मगदूम, विविध सहकारी कारखाने व संस्थांचे संचालक, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. (Ruturaj Patil)
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, गृहराज्यमंत्री योगेश कदम, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार वर्षा गायकवाड, विशाल पाटील, आमदार भाई जगताप, ज्योती एकनाथ गायकवाड, एकनाथ खडसे, सत्यजित तांबे, विश्वजीत कदम, माजी आमदार धीरज देशमुख, विक्रम सावंत, राजूबाबा आवळे, दत्त कारखाना चेअरमन गणपतराव पाटील, सौरभ राजू शेट्टी यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. (Ruturaj Patil)