Home » Blog » Russian plane crashed : रशियन विमान कोसळले

Russian plane crashed : रशियन विमान कोसळले

by प्रतिनिधी
0 comments
Russian plane crashed

मास्को : ४९ प्रवाशांना घेऊन जाणारे रशियाचे प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. गुरुवारी अमूर प्रदेशात बेपत्ता झालेल्या रशियन प्रवासी विमानाचा जळता भाग बचावासाठी गेलेल्या हेलिकॉप्टरने शोधून काढल्याचे वृत्त दिले आहे. (Russian plane crashed)

रशियाच्या पूर्वेकडील भागात हवाई वाहतूक नियंत्रणांशी संपर्क तुटल्यानंतर गुरुवारी ४९ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता झाले. टास न्यूज एजन्सीने सुत्रांचा हवाल देताना असे म्हटले आहे की अंकारा एअरलाइन्सद्वारे चालवले जाणार एएन-२४ विमान टिंडा विमानतळापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नियुक्त चौकीवर संपर्क साधण्यात अयशस्वी झाले. चीनला लागून असलेल्या अमूर प्रदेशात असलेल्या टिंडा जवळ विमानाशी संपर्क तुटला असे वृत्त ‘शॉट’ ने दिला आहे. (Russian plane crashed)

प्रादेशिक गव्हर्नर वासिली ऑर्लोव्ह यांनी सांगितले की विमानात ४३ प्रवासी होते. त्यामध्ये पाच मुले आणि सहा क्रू मेंबर्स होते. विमानाचा शोध घेण्यासाठी सैन्य आणि साधने तैनात केली आहेत. आपत्कालिन मंत्रालयाने विमानात अंदाजे ४० लोक होते असे म्हटले आहे. (Russian plane crashed)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00