प्रयागराज : महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेक बस रद्द केल्या आहेत. लखनौहून प्रयागराजला जाणारी त्रिवेणी एक्सप्रेसही रद्द केली आहे. त्यामुळे प्रयागराजमधून घरी जाणारे भाविक अडकून पडले आहेत. प्रयागराजच्या सीमेवर भाविकांना थांबवण्यात आले आहे. लखनौच्या सीमेवर ५० हजार भाविकांना थांबवून ठेवण्यात आले आहे. (Rush in prayag)
मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता प्रयागराज संगमावर झालेल्या चेंगराचेंगरात तीस भाविकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो भाविक जखमी झाले आहेत. अनेकजण बेपत्ता आहेत. चेंगराचेंगरीनंतर लखनौहून प्रयागराजकडे जाणारी बस वाहतूक बंद केली आहे. बछरावा आणि रायबरेलीत वाहतूक कोंडीत अनेक वाहने अडकून पडली आहेत. अनेक बसेसना प्रयागराजमध्ये प्रवेश दिलेला नसल्याने बसेस माघारी परतल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या भाविकांनाही संगमस्थळावर जाऊन दिलेले नाही. खासगी वाहने टोल नाक्याच्या मागे अडवली आहेत. त्यामुळे ५० हजार भाविक लखनौमध्ये अडकले आहेत. तर प्रयाग संगमावर स्नान आटपून परतणारे ३० हजार भाविक प्रयागराजमध्येच अडकले आहेत. (Rush in prayag)
बसेस रद्द केल्या असल्या तरी ८० हून अधिक बसेसमधून आलमबाग बस स्टेशनमधून भाविकांना घेऊन बसेस प्रयागराजच्या बाहेर गेल्या आहेत. वीस बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक यात्रेकरूंनी रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली. रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर मोठी गर्दी झाली आहे. (Rush in prayag)
प्रयागराजमध्ये भाविकांची प्रचंड संख्या असल्याने राष्ट्रीय महामार्गावर प्रयागराजकडे जाणाऱ्या बसेसची नाकाबंदी केली आहे. पोलिसांकडून या बसेस परत पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे यात्रेकरुंच्या खिशाला फटका बसत आहे. दुसरीकडे प्रयागराजकडे येणाऱ्या रेल्वे भरुन येत आहेत. बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत १२ हजार यात्रेकरु रेल्वेने प्रयागराजमध्ये आले आहेत. एकीकडे प्रयागराजमध्ये रेल्वेगाड्या रोखल्या असून दुसरीकडे प्रयागराजवरुन बाहेर जाण्यासाठी रेल्वे नसल्याने रेल्वेस्टेशन प्रवाशांनी खचाखच भरुन गेले आहे. लखनौहून प्रयागराजला येण्यासाठी विमानसेवा सुरू आहे. विमानाच्या तिकिटाचा दर १० हजार ७४२ रुपयांपर्यंत पोचला आहे.
हेही वाचा :
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, ३० भाविकांचा मृत्यू
अमृत स्नान पूर्ववत
कुंभमेळ्याचा ४५ कोटी भाविकांचा आकडा कुठून आला?