प्रयागराज : मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला. हे भाविक महाकुंभहून आंध्र प्रदेशात परतत होते. एका ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यात सात जण जागीच ठार झाले. (Road accident)
जबलपूरचे जिल्हाधिकारी दीपक कुमार सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून ६५ किमी अंतरावर असलेल्या सिहोरा शहराजवळ सकाळी साडेआठच्या सुमारास ही भीषण घटना घडली. ट्रक आणि ट्रॅव्हलर यांच्यात झालेल्या धडकेत आंध्र प्रदेशातील सात भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक महाकुंभात स्नान करून घरी परतत होते.(Road accident)
सिहोरा येथील मोहळा पुलावरून महामार्गावर चुकीच्या दिशेने ट्रक येत असल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण वाहनात अडकले होते. भाविकांच्या वाहनाशिवाय सिमेंटने भरलेल्या ट्रकने दुसऱ्या गाडीलाही धडक दिली.
मध्य प्रदेशात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच जबलपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. पोलीस, स्थानिक प्रशासन आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. या अपघातात आतापर्यंत दोघे जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम सिहोरामधील शासकीय रुग्णालयात आणि नंतर जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.(Road accident)
दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एक्स पोस्टवर त्यांनी म्हटले आहे, ‘जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा येथे नागपूर-प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावर प्रयागराजहून परतणाऱ्या एक प्रवासी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यात आंध्र प्रदेश राज्यातील यात्रेकरूंचा मृत्यू झाला. काही जखमी झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. सर्व शोकग्रस्त कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींवर योग्य उपचार करून सर्व मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून मृतदेह पाठवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना मी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. शोकाकुल कुटुंबाला हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.’
जबलपुर जिले के सिहोरा में नागपुर-प्रयागराज नेशनल हाइवे पर प्रयागराज से वापस आ रही ट्रैवलर और ट्रक की भीषण सड़क दुर्घटना में आंध्रप्रदेश राज्य के तीर्थयात्रियों की असामयिक मृत्यु एवं घायल होने का समाचार अत्यंत ही दुखद है, मेरी संवेदनाएं सभी शोकाकुल परिजनों के साथ हैं। जिला प्रशासन…
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) February 11, 2025
हेही वाचा :