Home » Blog » Mahakumbh fire : महाकुंभ मेळ्यात आग

Mahakumbh fire : महाकुंभ मेळ्यात आग

५० तंबू खाक

by प्रतिनिधी
0 comments
Fire-In-Mahakumbh

प्रयागराज : उत्तरप्रदेश : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात रविवारी दुपारी चार वाजता मोठी आग लागली. आगीत ५० तंबू जळून भस्मसात झाले. घटनास्थळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. सिलिंडर स्फोटामुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवले असून महाकुंभ मेळ्यातील वीज पुरवठा खंडीत केला आहे. (Mahakumbh fire)

महाकुंभ मेळ्यात आज रविवारी हजारो भाविकांनी भेट दिली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कुंभमेळा शिबिर परिसरातील सेक्टर १९ जवळील गीता प्रेस शिबिरात आग लागली. स्वयंपाक करत असताना सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. आग परिसरात भडकल्याने ५० तंबू जळून खाक झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे १२ हून अधिक फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवळजवळ यश मिळवले आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरने आगीवरील नियंत्रणाचा आढावा प्रशासनाने घेतला.(Mahakumbh fire)

महाकुंभ मेळाल्या देश विदेशातील ४० कोटीहून अधिक भाविक दीड महिन्यात भेट देणार असल्याने उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ नगरीमध्ये अत्याधुनिक चार आर्टिकुलेटिंग वॉटर टॉवर सिस्टीम तैनात केली आहेत. या यंत्रणेनेत व्हिडिओ थर्मल इमेजिनिंग सारखी अत्याधुनिक अडव्हान्स सिस्टीम आहे. विशाल महाकुंभ मेळ्यात ३५० हून अधिक फायर ब्रिगेड, दोन हजार कर्मचारी ५० अग्निशमन केंद्र आणि वीस फायर पोस्ट सज्ज ठेवले आहेत. तिथे अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे.(Mahakumbh fire)

महाकुंभ नगरीत सेक्टर १९ मध्ये लागलेली आग सेक्टर वीसपर्यंत पोचली होती. त्यामुळे आग आणि धुराचे लोळ दूरवरुन पहायला मिळत होते. सुरवातील आग भडकल्याने ती नियंत्रणात आणताना फायर ब्रिगेडच्या १२ गाड्यांना खूप प्रयत्न करावे लागले. आगीत २० हून अधिक सिलिंडराचा स्फोट झाला आहे. महाकुंभमेळाचे अधिकारी राजेश द्विवेदी घटनास्थळी पोचले. आगीवर नियंत्रण मिळवले असून मनुष्यहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :
कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडवा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00