Home » Blog » Reel star Ravina : रिल्स स्टारकडून पतीचा खून

Reel star Ravina : रिल्स स्टारकडून पतीचा खून

मृतदेह नाल्यात फेकला

by प्रतिनिधी
0 comments
Reel star Ravina

चंदीगड : यू ट्यूबर रिल्स स्टारने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. रिल्स स्टार आणि तिच्या प्रियकराने मोटार सायकलरुन मृतदेह नाल्याचे फेकल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी रिल्स स्टारला ताब्यात घेतले असून प्रियकराचा शोध सुरू आहे. (Reel star Ravina)

हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात एका व्यक्तीला त्याच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराचे प्रेमसंबंध कळल्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित रविना एक युट्यूबर रिल्स पोस्ट करत होती. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओ आणि रिल्सवरून रविनाचे पती प्रवीणसोबत वारंवार वाद घालत असे. रविना आणि प्रविणचा विवाह  २०१७ मध्ये झाला असून त्यांना मुकुल नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे. (Reel star Ravina)
रेवाडी जिल्ह्यातील जुडी गावातील रहिवासी रविना हिने भिवानीतील जुन्या बस स्टँडजवळील गुजरों की धानी येथील रहिवासी प्रवीणशी लग्न केले होते. प्रवीण वाळू आणि रेतीच्या दुकानात ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचा दारुचे व्यसन होते. रविनाच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीवरून या जोडप्याचे अनेकदा भांडण होत असे. (Rills star Ravina)
सुमारे दीड वर्षांपूर्वी, रविनाच हिसार जिल्ह्यातील प्रेमनगर गावातील सुरेश या युट्यूबरशी इंस्टाग्रामद्वारे मैत्री करत असल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ मार्च रोजी प्रवीणने रविना आणि सुरेश यांना भिवानी येथील त्यांच्या घरी आक्षेपार्ह स्थितीत पकडले होते. त्यानंतर जोरदार वाद झाला. त्या रात्री नंतर रवीना आणि तिच्या प्रियकराने प्रवीणचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. (Reel star Ravina)
संशय येऊ नये म्हणून दोघांनी प्रवीणचा मृतदेह दुचाकीवरून शहराबाहेरील दिनोड रोडवरील नाल्यात फेकून दिला. तीन दिवसांनंतर, शोध मोहिमेदरम्यान, पोलिस आणि प्रवीणच्या कुटुंबाला नाल्यातून त्याचा कुजलेला मृतदेह सापडला. (Rills star Ravina)
पोलिसांनी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही क्लिप्स तपासल्या. २५ मार्चच्या रात्री एका सीसीटीव्हीमध्ये एक संशयास्पद दुचाकी दिसली. फुटेजमध्ये हेल्मेट घातलेला एक माणूस आणि रवीना नंतर त्याच दुचाकीवर बसलेले दिसून आले. दोघांच्यामध्ये एक मृतदेह असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी रवीनाची कसून चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे तर पोलिस तिचा फरार प्रियकर सुरेशचा शोध घेत आहेत. (Reel star Ravina)

हेही वाचा :

नागपुरात ५८० बोगस शिक्षक भरतीत कोट्यवधीचा चुना

कैद्याचा कोठडीत मृत्यू झाल्यास नातेवाईकांना मिळणार पाच लाख!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00